रिकॅलिब्रेशन न करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात परिवहन विभागाने रविवारपासून धडक कारवाई सुरू केली आहे. रविवारी दिवसभरात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि वसई शहरांतील तब्बल ३०० रिक्षा-टॅक्सींवर जप्ती व अन्य प्रकारची कारवाई करण्यात आली.
परिवहन विभागने ताडदेव येथे २६ टॅक्सी, वडाळा येथे १६ रिक्षा, अंधेरी येथे ३ रिक्षा, २ टॅक्सी, वसईत ४७ रिक्षा तर नवी मुंबईत ४५ रिक्षांवर कारवाई केली. तर  ठाण्यात ७५ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. वडाळा येथे मीटरमध्ये फेरफार केलेल्या २६ रिक्षा जप्त करण्यात आल्या. रिकॅलिब्रेशन न करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सींवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असे परिवहन आयुक्त व्ही एन मोरे यांनी सांगितले. ग्राहकांनी तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये दिवसभरात ३६८ रिक्षा तपासण्यात आल्या. त्यामधील ६८ रिक्षा जप्त करण्यात आल्या, अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा