मुंबई हल्ल्याच्या कटातील सुत्रधारांपैकी एक असलेला ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याची अमेरिकेतील तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू असून, चौथ्या दिवशी हेडलीने इशरत जहाँप्रकरणाशी संबंधित धक्कादायक खुलासे केले आहेत.
मुंब्रा येथील इशरत जहाँ ही तरूणी ‘लष्कर-ए-तोयबा’ची हस्तक होती. कुठल्यातरी एका नाक्यावर पोलिसांना मारण्याचा कट होता. त्यात ती सामील होती, असा खळबळजनक खुलासा हेडलीने केला आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’च्या महिला विंगची सुसाईड बॉम्बर असलेल्या इशरतकडे मोदींना मारण्याची जबाबदारी होती. गुजरातमधील अक्षरधाम मंदिर देखील इशरतच्या निशाण्यावर होते, असेही महत्त्वपूर्ण खुलासे हेडलीने केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुजरातमधील अहमदाबादमध्ये १५ जून २००४ रोजी पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटमध्ये चार दहशतवादी ठार केल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये इशरत जहाँ या महाविद्यालयीन तरुणीचाही समावेश होता. तिच्यासोबत जावेद शेख हा तिचा मित्र होता. याशिवाय मारले गेलेले इतर दोन साथीदार हे पाकिस्तानी असल्याचे सांगण्यात आले होते. या एन्काऊंटरप्रकरणावरून देशात मोठा वाद निर्माण झाला होता. इशरत ही दहशतवादी नव्हती असा दावा अनेकांनी केला होता. पोलिसांनी बनावट चकमक करून चौघांना ठार केले आणि चकमक दाखविण्यासाठी त्यांच्या हातात हत्यार सोपविल्याचेही आरोप करण्यात आले होते.

दरम्यान, बुधवारी अमेरिकेच्या बाजूने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने हेडलीची साक्ष नोंदविता आली नव्हती. त्यानंतर आज सकाळी साडेसातच्या सुमारास हेडलीची साक्ष पुन्हा एकदा सुरू झाली. मुंबईवरील हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआयने पैसा पुरविल्याचा खुलासा हेडलीने केला आहे. मुंबईला येण्याआधी लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआयने मोठी आर्थिक मदत केली होती. मेजर इक्बाल, साजिद मीर आणि तहव्वूर राणा यांच्याकडून मला पैसे मिळाले होते, असेही हेडलीने कबुल केले आहे. याशिवाय, २६/११ हल्ल्याआधी तहव्वूर राणा भारतात आला होता. पण तो अडचणीत येऊ नये म्हणून मी त्याला अमेरिकेला जाण्याचा सल्ला दिला होता, असे हेडलीने सांगितले.

हेडलीने आज केलेले खुलासे-
* इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची हस्तक
* नरेंद्र मोदी यांना मारण्याची जबाबदारी इशरतवर होती.
* गुजरातमधील अक्षरधाम मंदिर इशरतच्या निशाण्यावर होते.
* १४ सप्टेंबर २००६ रोजी मी मुंबईतील ताडदेव परिसरात माझं ऑफीस सुरू केलं होतं.
* ११ ऑक्टोबर २००६ ला तहव्वूर राणाने मला ६६,६०५ रुपयांची मदत केली.
* त्यानंतर पुढच्याच महिन्यात तहव्वूरने पुन्हा एकदा ५०० यूएस डॉलरची मदत केली.
* ३० नोव्हेंबरला १७,६३६ आणि ४ डिसेंबरला १००० यूएस डॉलर इतका पैसा तहव्वूरने पुरवला.
* तहव्वूरने पुरवलेला सर्व पैसा नरिमन पॉईंट येथील इंडसइंड बँकेतील खात्यातून हस्तगत केला.
* भारतात येण्याआधी साजिद मीरने ४०,००० पाकिस्तानी चलन दिले होते, तर मेजर इक्बालने २५ हजार यूएस डॉलर दिले.