Mumbai Rain Update : राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर मुंबईत आज ( शुक्रवार ८ जुलै ) दुपारपासून रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. दुपारी एक वाजेपासून पुढचे २४ तास हा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत रेड अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज दुपारी एक वाजल्यापासून पुढे २४ तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई मनपाकडून देण्यात आली आहे. तसेच मुंबईकरांनी आपला प्रवास आणि इतर बाबींचे नियोजन करावे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, आवाहनही मनपाकडून करण्यात आले आहे.

manoj jarange patil health update
“मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, हे शरीर कधी जाईल…”, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक विधान!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

रेड अर्लट काय असतो?

एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीची शक्यता असते, त्यावेळी हवामान विभागाकडून रेड अलर्ट घोषित करण्यात येतो. अशा वेळी नागरिकांना शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते.

हेही वाचा – मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार ; आतापर्यंत सरासरीच्या ३६ टक्के पाऊस