टोलच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांना त्रास होत असल्यास टोलचे दर कमी करा, पण गुंतवणुकीचा विचार करता एकदम रद्द करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मांडली.
कोल्हापूरमध्ये टोलच्या विरोधात आंदोलन करण्यात आल्याने टोल रद्द करण्याची घोषणा मंत्र्यांनी केली. तर संतप्त नागरिकांनी टोल नाकेच पेटवून दिले. सांगलीतही आंदोलन सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यात सुप्रिम या ठेकेदाराच्या मनमानीच्या विरोधात नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे. टोलच्या संदर्भात पवार यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी टोल रद्द करण्यास अप्रत्यक्षणपणे विरोध केला. ते म्हणाले, नागरिकांना टोलचा त्रास होत असल्यास दर कमी केले जावेत. पायाभूत सुविधांकरिता सरकारजवळ पुरेसा निधी नाही. अशा वेळी खासगीकरण हा पर्याय असतो. खासगीकरणाची प्रक्रिया कोलमडून पडू नये, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा