मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. या मोहीमेद्वारे अपघातांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ च्या तुलनेत जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात घटले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महामार्ग पोलीस, आरटीओ विभाकडून वारंवार जनजागृती कार्यक्रम, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याने, अपघातांना ब्रेक लागल्याचे समोर आले आहे.जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एकूण ३२९ अपघातांची नोंद झाली होती.

हेही वाचा…वांद्रे रेक्लमेशन येथील २९ एकर जागेवर एमएसआरडीसी उभारणार इमारत; संयुक्त भागीदारी प्रकल्पाअंतर्गत जमिनीचा विकास

यातील १५२ प्राणांतिक अपघात झाले असून यात १८६ जणांचा मृत्यू झाला. तर, जानेवारी ते डिसेंबर २०२३ यादरम्यान २७१ अपघात झाले.यात १०३ अपघात हे प्राणांतिक असून यामध्ये १२६ जणांना आपला जीव गमावला.

दोन वर्षाच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत १७.६२ टक्क्यांनी, प्राणांतिक अपघातांत ३२.२३ टक्क्यांनी आणि मृतांच्या संख्येत ३२.२५ टक्क्यांनी घट झाली, अशी माहिती राज्य परिवहन विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा…आरसीएफ येथील रस्त्याच्या कामामुळे ८९ झाडांवर गंडांतर

६५ हजार वाहनचालकांना दिला वाहतूक नियमांचा धडा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी, आरटीओ विभागाकडून जनजागृती सुरू आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली गेली आहे. तर, गेल्या संपूर्ण वर्षात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ६५ हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केलेल्या चालकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना वातानुकूलित कक्षात बसवून, त्यांना पाण्याची सोय उपलब्ध करुन, वाहतूक नियम सांगितले. – विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

३२.२३ टक्क्यांची घट

वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगात वाहन चालवणे, वाहन चालवताना झोप येणे, रस्त्याची मार्गिका वारंवार बदलणे अशा प्रकारांमुळे अपघात वाढतात. मात्र हे प्रकार आरटीओ विभाग आणि महामार्ग पोलिसांकडून रोखले जात आहेत. यासह रस्ता सुरक्षा मोहीम राबवून वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जाते. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताच्या संख्येत ३२.२३ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduction in accidents on mumbai pune expressway public awareness program started by highway police and rto mumbai print news psg