राज्यात निवडणुकीचे वेध लागल्याची पार्श्वभूमी असताना आज सोमवार राज्यातील औद्यागिक वीजदर २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी “राज्य सरकारची लबाडी काही थांबलेली नाही. ‘एमइआरसी’च्या निर्णयाने लागलेले पाच विविध कर पुढील महिन्यात संपत असल्याने तसेही पुढच्या महिन्यात वीजदर आपोआप २० टक्क्यांनी कमी होणारच होते” असे म्हटले आहे.
तसेच आघाडी सरकार दिल्लीतील आम आदमी पक्षाची नक्कल करू पाहत आहे. वीज कंपन्यांतील भ्रष्टाचार कमी करून वीजदर कमी करण्याएवजी कर्ज काढून दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कोणती निती आहे? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून उपस्थित केला आहे. त्याचबरोबर हा निर्णय केवळ दहा महिने म्हणजे निवडणुकीपर्यंतचा असेल परंतु, मतदार जाणता आहे. त्यामुळे मते झोळीत पाडण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला जनता बळी पडणार नाही. असेही फडणवीस म्हणाले.  

Story img Loader