तिकीट वितरण यंत्र (ईटीआय मशीन) नादुरुस्त झाल्यास वाहकाच्या वेतनातून त्याची रक्कम कापण्याचा अजब निर्णय बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने घेतला आहे. या यंत्राच्या वेगवेगळ्या भागांच्या किंमतीनुसार कपात करण्यात येणाऱ्या वेतनाचे पत्रकच काढले आहे. याविरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून त्याचा निषेध करण्यासाठी बेस्ट वर्कर्स संघटनेकडून मंगळवारी वडाळा आगारात निदर्शने करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- भाऊचा धक्का ते मोरा रो रो प्रकल्प; मोरा जेट्टीच्या कामाला १५ दिवसांत सुरुवात

काही बेस्ट आगारांमध्ये वाहकांकडून तिकीट वितरण यंत्र परत घेत असताना त्याचे कव्हर, यंत्राच्या दर्शनी भागाच्या सुरक्षेसाठी असलेले संरक्षक पारदर्शक प्लास्टिक आवरण कापून टाकण्यात आल्याचे तिकीट व रोख रक्कम विभाग कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. आवरण काढून टाकण्यात आल्याने यंत्राचा दर्शनी भाग खराब होणे, यंत्र बॅगमधून खाली पडण्याची तसेच पावसाळ्यात प्लास्टिक आवरणाअभावी ते भिजून नादुरुस्त होण्याची शक्यता असल्याचे काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. यंत्र नादुरुस्त झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कारवाई केली जाणार असून नादुरूस्त झालेल्या सुट्ट्या भागाची किंमत कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयाविरोधात ११ ऑक्टोबरला वडाळा आगारात दुपारी तीन वाजता कर्मचारी आंदोलन करणार असल्याचे बेस्ट वर्कर्स संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.

हेही वाचा- अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू; ३ नोव्हेंबरला मतदान

किती वेतन कापणार?

यंत्राचे कव्हर किंवा बॅग मागील कव्हर- १५८२ रुपये

बॅटरी कव्हर – ११०५ रुपये

बॅटरी -२२१४ रुपये

थर्मल प्रिंटर- १८०३ रुपये

एलसीडी आणि पुढील बाजूस असणारे आवरण – ४७३७ रुपये

मेनबोर्ड- ८४३८ रुपये

वायफाय अँटिना ब्रॅकेट – ९६० रुपयेपेपर फ्लॅप – ९६० रुपयेयुफसी केबल – ५३८ रुपये

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduction of carriers wages in case of failure of ticket dispensing machine decision of the best mumbai print news dpj