लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १०३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपचे नेते मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध दाखल फसवणुकीचे प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा सीबीआयने दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयाने फेटाळला.

man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
fake power of attorney marathi news
सोलापूर : नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

सीबीआयने केलेला तपास अपूर्ण आहे. किंबहुना, तो पुरेसा नसल्याची टिप्पणीही करून अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी जयवंत यादव यांनी प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल फेटाळला. तसेच, तपास यंत्रणेने प्रकरणाचा पुढील तपास करून योग्य तो अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा-म्हाडाच्या ३८८ पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा

आरोपींनी गुन्हेगारी कट रचून फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत होते. आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे राष्ट्रीयीकृत बँकेची अनुक्रमे नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून त्याचा दुरुपयोग केला, असे न्यायालयाने सीबीआयचा अहवाल फेटाळताना नमूद केले.

टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या कंबोज आणि इतर आरोपींनी क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची १०३ कोटी रुपयांची फसवणूक केली, असा सीबीआयचा आरोप आहे. परंतु, कंपनी आणि तिच्या संचालकांवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आढळून आलेले नाहीत, असा दावा करून सीबीआयने प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल न्यायालयात सादर केला होता.

Story img Loader