मुंबई : वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्टची सक्ती केल्यानंतर परिवहन विभागही या नियमाची अंमलबजावणी करण्याचा विचार करीत आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र देण्यापूर्वी वाहनामध्ये सीटबेल्टच्या नियमाचे पालन झाले आहे की नाही याची तपासणी करण्याचा, तसेच तपासणीदरम्यान चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट नसल्याचे निदर्शनास आल्यास वाहन मालकाला योग्यता प्रमाणपत्र न देण्याचा विचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहन चालकासह मागील आसनावर बसलेल्या सहप्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक केले. या नियमाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध १ नोव्हेंबरपासून कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर आता ‘आरटीओ’ही योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) मिळविण्यासाठी येणाऱ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहनांमध्ये वरील नियमाचे पालन करण्यात आले की नाही याची तपासणीही करण्याचा विचार करीत आहे. वाहनांचे ब्रेक, दिव्यांची प्रखरता, वाहन नेमके चालते कसे याचीही तपासणी योग्यता प्रमाणपत्र देण्यापूर्वी करण्यात येते. संबंधित निरीक्षक प्रत्यक्षात वाहन तपासून, आवश्यकतेनुसार चाचणी घेतात आणि त्यानंतरच वाहन योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. मात्र आतापर्यंत सीट बेल्टची तपासणी करण्यात आलेली नाही.

Pedestrian day Pedestrian Policy Pune Municipal Corporation pune news
पदपथांंअभावी पादचारी ‘दीन’
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
Loksatta vyaktivedh Indu Chandhok Passes Away The Culture of Car Racing in India Car Racing Formula One
व्यक्तिवेध: इंदु चंधोक
kalyan 125 constructions demolished marathi news,
कल्याण : बाह्यवळण रस्ते मार्गातील अटाळी येथील १२५ बांधकामे जमीनदोस्त
Mandatory helmets on two wheeler along with rider on back seat is a decision that disturbs general public sentiment
दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती, निर्णयास ग्राहक पंचायतीचा विरोध
The responsibility for repairing roads within PMRDA limits is fixed on the contractors Pune print news
दोष दायित्व कालावधीतील रस्ते दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांचीच; पीएमआरडीएची भूमिका, ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, अवजड, जड यांसारख्या व्यावसायिक वाहनांची प्रथम दोन वर्षांनी एकदा तपासणी होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी एकदा तपासणी करावी लागते. वैयक्तिक चारचाकी वाहनांची १५ वर्षांनी आरटीओमध्ये तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर दर पाच वर्षांनी वाहनाची तपासणी करावी लागते. मुंबई वाहतूक पोलिसांच्या आदेशानंतर योग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणाऱ्या वाहनांमध्ये सीटबेल्ट आहे की नाही याचीही तपासणी करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सीटबेल्ट नसेल तर योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आदेशानंतर मुंबई महानगरातील सर्व आरटीओकडून यासंदर्भात विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले.

चालक-प्रवाशांमध्ये वादाची शक्यता

सीट बेल्ट सक्ती केल्याने टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये वादाची शक्यता नाकारता येणार नाही. चालकाने सीट बेल्टसाठी आग्रह धरल्यास प्रवाशांकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. अन्यथा प्रवाशाने नकार दिल्यास वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

टॅक्सी संघटनेचा सोमवारपर्यंत निर्णय..

 मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या निर्णयामुळे सध्या रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या टॅक्सी अडचणीत येऊ शकतात. मुंबईत मोठय़ा प्रमाणात काळय़ा-पिवळय़ा टॅक्सी धावतात. यामध्ये नव्या कंपन्यांच्याही टॅक्सी आहेत. तसेच जुन्या ओमनी टॅक्सीही असून यामध्ये मागील आसनांत मधल्या प्रवाशासाठी सीटबेल्ट सुविधा नाही. त्यामुळे नवीन सीट बेल्ट बसविण्यासाठी एक – दोन हजार रुपयांपर्यंत जादा रक्कम मोजावी लागेल, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोज यांनी सांगितले. याबाबत सोमवापर्यंत टॅक्सी संघटनेकडून निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

प्रवासी क्षमतेनुसार सीटबेल्ट..

वैयक्तिक जुन्या वाहनांच्या मागील आसनावर सीट बेल्ट असूनही काहींनी ते काढले आहेत.  मात्र २००२ मध्ये केंद्र सरकारने  सीट बेल्टबाबत नवीन कायदा आणला. नवीन वाहनांमधील मागील आसनावरील सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट उपलब्ध करण्याच्या कायद्याचा त्यात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे छोटय़ा – मोठया वैयक्तिक वाहनांमध्ये वाहन उत्पादक कंपन्याकडून प्रवासी क्षमतेनुसार सीटबेल्ट बसविण्यात येत असल्याचे परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

  • चारचाकी वाहन असो किंवा अन्य कोणतेही वाहन चालक आणि सहप्रवाशांनी सीटबेल्टचा वापर केलाच पाहिजे. गेल्या २० वर्षांत अनेक नवीन चारचाकी वाहने आली असून त्यात प्रवासी क्षमतेनुसार सीटबेल्ट उपलब्ध करण्यात येतात. मात्र वाहनांत बदल करताना किंवा प्रवासा वेळी मागे बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्टचा अडथळा होत असल्याने ते काढून टाकण्यात येत असावेत. त्यामुळेच सीट बेल्ट बसविण्याचीही सक्ती वाहतूक पोलिसांनी केली असावी, असा अंदाज वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील, तसेच राज्याच्या इतर भागांतून या शहरात येणाऱ्या चारचाकी वाहनांचीही तपासणी केल्यानंतर सीट बेल्ट नसल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. चारचाकी वाहनांमध्ये चालक, सहप्रवासी आणि मागील आसनावरील  उर्वरित प्रवाशांनाही सीट बेल्ट सक्ती आहे.

– राजवर्धन सिन्हा, सहपोलीस आयुक्त, मुंबई वाहतूक पोलीस

Story img Loader