मुंबईतील डोंबिवलीमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने २५ वर्षीय तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. पण, तरुणीने लग्नास नकार दिला. याच रागातून तरुणाने तरुणीच्या गळ्यावर सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत तरूणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिग्नेश असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तो डोबिंवली पूर्वमधील देसलेपाडा परिसरात राहतो. याच परिसरात तरुणीही राहते. तरुणी जिग्नेशला आपला मित्र समजत होती. तर, जिग्नेशचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं.

हेही वाचा : मालाडमध्ये ६९ वर्षीय महिलेची हत्या; घरातील दागिने व मोबाइलची चोरी; मोलकरणीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

१४ एप्रिलला तरुणी एकटीच आपल्या घरी जात होती. डोंबिवली पूर्वच्या शांतीनगर परिसरात वेद ओमशांती सोसायटी जवळच्या रोडवर ती जेव्हा आली, तेव्हा अचानक जिग्नेश तिथे आला. त्याने रस्त्यावर तरुणीला लग्नासाठी मागणी घातली.

“मला तू खूप आवडते. लग्न केलं तर, तुझ्याशीच करणार”, असं जिग्नेश तरुणीला म्हणाला. ही मागणी तरुणीने फेटाळली. याच रागातून जिग्नेशने तरुणीच्या गळ्यावर वार केले आणि पळून गेला. याबाबतची माहिती मिळताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : मुंबई: खोट्या विम्याच्या माध्यमातून कर्ज घेऊन बँकेची सव्वाकोटींची फसवणूक

पोलिसांनी तरुणीला डोबिंवलीच्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. पण, गंभीर जखमी झाल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या तरुणीवर उपचार सुरू असून, तिची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी आरोपी जिग्नेशला ताब्यात घेतलं आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Refusing marriage young man attacked 25 year old woman in dombivli mumbai ssa
Show comments