मुंबई : विदर्भातील संत्रा, मोसंबी या प्रमुख शेतीमालासह अन्य प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी नागपूर येथे कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) प्रादेशिक कार्यालय सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अपेडा’चे अध्यक्ष अभिषेक देव यांना पत्र पाठवून नागपुरात प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याची मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्र शेतीमालाच्या निर्यातीत आघाडीवर आहे. राज्यातून होणारी शेतीमालाची निर्यात प्रामुख्याने जेएनपीटीतून होते. मुंबई, पुणे आणि नाशिक येथे अद्यायावत निर्यात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. विदर्भ किंवा मराठवाड्यात अशी उच्च दर्जाचे निर्यात सुविधा केंद्रे नाहीत. नागपूर ते मुंबई हे सुमारे ७०० किलोमीटरचे अंतर पार करून शेतीमालाची निर्यात करणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे नाही.

Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?

हेही वाचा >>>‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार

नागपुरात कृषी विषयक विविध संस्था कार्यरत आहेत. निर्यात सुविधाही उभारल्या जात आहेत. रस्ते, लोहमार्ग आणि हवाई वाहतुकीने नागपूर जोडले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतीमालाच्या निर्यातीसाठी नागपूर येथे अपेडाने प्रादेशिक कार्यालय सुरू करावे. या कार्यालयाच्या माध्यमातून विदर्भातील शेतीमालाच्या निर्यातीला चालना मिळेल. प्रामुख्याने भौगोलिक मानांकन मिळेलेले संत्रा, मोसंबी, अमरावतीच्या डाळी, कापूस, वाहेगावच्या हळदीसह मराठवाड्यातील अन्य जीआय मानांकन मिळालेल्या शेतीमालाच्या निर्यातीला चालना मिळण्यासाठी अपेडाच्या नागपूर येथील कार्यालयाची गरज आहे. वाहतूक खर्च आणि वेळेची बचत होऊन निर्यातीला प्रोत्साहन मिळेल.

अपेडाच्या या कार्यालयाचा फायदा विदर्भासह मराठवाडा, तेलंगाणा आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनाही होईल. त्यामुळे नागपुरातील कार्यालय केवळ विदर्भासाठी नव्हे तर मध्य भारताचे प्रादेशिक कार्यालय म्हणून काम करू शकेल, असेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) सीईओ प्रवीण परदेशी यांनी या बाबत पुढाकार घेऊन अपेडाशी पत्र व्यवहार सुरू केला आहे.

हेही वाचा >>>वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ, बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार

अपेडा सकारात्मक – डॉ. परशराम पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे अपेडाचे कार्यालय सुरू करण्याच्या मागणीचे पत्र अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांना मिळाले आहे. राज्य सरकारने नागपुरात कार्यालयासाठी जागा, कर्मचारी आणि अन्य पायाभूत सुविधा पुरविल्यास नागपुरात कार्यालय सुरू करण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देव यांनी दिली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीतही या बाबत चर्चा झाली असून, नागपूर येथे कार्यालय सुरू करण्याबाबत अपेडा सकारात्मक आहे, अशी माहिती अपेडाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि कृषी अर्थ सल्लागार डॉ. परशराम पाटील यांनी दिली.

Story img Loader