१५ मेपर्यंतची मुदत; अन्यथा ५ हजार दंड व कारावासाची शिक्षा
मुंबईमध्ये गल्लोगल्ली वधू-वर सूचक मंडळे थाटून सर्वसामांन्यांची लूट करणाऱ्यांना चाप बसविण्याची तयारी राज्य सरकार आणि महापालिकेने सुरू केली आहे. समस्त वधू-वर सूचक मंडळांना अथवा ते चालविणाऱ्या व्यक्तींना येत्या १५ मेपर्यंत विवाह निबंधकांकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी न करणाऱ्या अथवा नोंदणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड अथवा सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी वधू-वर सूचक मंडळे सुरू आहेत. काही व्यक्ती, तर काही सामाजिक, ज्ञाती संस्थांच्या माध्यमातून ही मंडळे चालविली जातात. या मंडळांवर कोणाचेच नियंत्रण नाही. वधू-वर परिचयापासून थेट त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकण्यापर्यंतची कामे या मंडळांच्या माध्यमातून चालतात. त्यासाठी वधू-वरांना मोठी रक्कमही मोजावी लागते. अशा मंडळांकडून वधू किंवा वराची फसवणूक झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने वधू-वर सूचक मंडळांची नोंदणी करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील वधू-वर सूचक मंडळांची विवाह निबंधकांकडे नोंदणी करण्याची जबाबदारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, साहाय्यक आरोग्य अधिकारी, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी आणि संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. येत्या १५ मेपर्यंत मंडळ अथवा व्यक्तीची विवाह निबंधकांकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विवाह मंडळांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे अधिकार व मंडळे रद्द करण्याचे अधिकारही निबंधकांना आहेत. नियम न पाळणाऱ्या विवाह मंडळांची केवळ नोंदणी रद्द होणार नाही, तर मंडळ चालकास पाच हजार रुपयांपर्यंत दंड अथवा सहा महिन्यांपर्यंत साध्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते.

नवीन नियम काय?
* विवाह मंडळ चालवू इच्छिणारी व्यक्ती अथवा व्यक्तींच्या गटाला महाराष्ट्र विवाह मंडळ विनियम व विवाह नोंदणी नियम, १९९९ मधील तरतुदीनुसार विवाह निबंधकांकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे.
* मंडळ एखादी विश्वस्त संस्था असल्यास त्याचा उल्लेख असलेली प्रत, अर्जदाराची ओळख पटविणारे शासकीय दस्त व त्याच्या निवासस्थानाच्या पुराव्याची प्रत अर्जासोबत सादर करावी लागणार आहे.
* सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर विवाह निबंधकांकडून मंडळाची नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.
* दर दोन वर्षांनी मंडळाला प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.
* विवाह मंडळाच्या नोंदणीकृत जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी मंडळाला आपले काम करता येणार नाही.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
menstrual leave mva provision
मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
multiple languages issue considered in constituent assembly
संविधानभान : भारताचे बहुभाषिक कवित्व
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?