मुंबई : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता परिचारिका संवर्गातील प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. बीएस्सी नर्सिंग, सामान्य परिचर्या व प्रसविका (जीएनएम), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन), मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना एक महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत चालवण्यात येणाऱ्या परिचारिका संवर्गातील अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत राबवण्यात येते. राज्यामध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ११ हजार २८० जागा आहेत. तर मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या अभ्यासक्रमाच्या ४० आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका अभ्यासक्रमाच्या ३० जागा आहेत. परिचारिका संवर्गांतील बीएस्सी नर्सिंग, सामान्य परिचर्या व प्रसाविका या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर होणार आहे. तर सार्वजनिक आरोग्य परिचारिका आणि मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा राज्यातील मुंबई, पुणे, संभाजी नगर व नागपूर या चार परीक्षा केंद्रांवर होणार आहे. बीएस्सी नर्सिंग, सामान्य परिचर्या व प्रसाविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका आणि मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करून शुल्क भरता येणार आहे.

राज्यामध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ११ हजार २८० जागा आहेत. त्याचप्रमाणे सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण देणाऱ्या २३ संस्था असून ९२० जागा आहेत. तर मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या अभ्यासक्रमासाठी पुणे व ठाण्यामध्ये प्रत्येकी एक अशी केवळ दोन महाविद्यालये असून, यासाठी ४० जागा आहेत. आहेत. सार्वजनिक आरोग्य परिचारिका अभ्यासक्रमासाठी नागपूर येथे १ महाविद्यालय असून ३० जागा आहे. गतवर्षी बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ५८ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५० हजार २१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ११ हजार २८० जागांपैकी ९ हजार २४४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याचप्रमाणे मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका, सार्वजनिकआरोग्य परिचारिका या अभ्यासक्रमासाठी ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका व सार्वजनिकआरोग्य परिचारिकासाठी असलेल्या ७० जागांपैकी ६९ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Registration process for mh bsc nursing cet 2025 exam started mumbai print news zws