पिंपरी-चिंचवड येथे १५ ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रतिनिधी नोदणीस सुरुवात झाली आहे. तसेच संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शनातील पुस्तक विक्रीच्या गाळ्यांसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे.
१५ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजल्यापासून १८ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत निवासाची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. निवास आणि भोजनाचे शुल्क प्रत्येकी दोन हजार रुपये आहे. संमेलन काळात स्वत:ची निवास व्यवस्था करणाऱ्या प्रतिनिधींना बाराशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या व्यवस्थेत सकाळी चहा, नाष्टा तसेच दोन वेळच्या भोजनाचा समावेश आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर अशी आहे. पुस्तक प्रदर्शनाच्या गाळ्यासाठी नावनोंदणी व प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर असून गाळ्यांची सोडत ४ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे.
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी साहित्य संमेलन कार्यालय, ८ वा मजला, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, संत तुकाराम नगर, िपपरी, पुणे ४११०१८ येथे किंवा ०२०- २७४२१०९५, ९८५०३ ०५९९५ या दूरध्वनी क्रमांकांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.<http://www.sahitysammelan.dpu.edu.in/> या संकेतस्थळावरही अधिक माहिती उपलब्ध आहे. संमेलन प्रतिनिधी किंवा पुस्तक गाळ्यासाठीचे अर्ज संकेतस्थळावरूनही डाऊनलोड करून घेता येणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रतिनिधी नोंदणीस सुरुवात
संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शनातील पुस्तक विक्रीच्या गाळ्यांसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे.
Written by मंदार गुरव
आणखी वाचा
First published on: 04-12-2015 at 01:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Registration start in akhil bharatiya marathi sahitya sammelan