विधिमंडळाच्या कामकाजात झालेली कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांच्या विधानावरून सभागृहात खेद व्यक्त करण्याची तयारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दर्शविली असली तरी ते राष्ट्रवादीसाठी अडचणीचे ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त करावा का, या प्रश्नावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार , असे सांगत मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त करण्यास अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविला. मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केल्यास त्याला वेगळा राजकीय रंग दिला जाईल.
तसेच आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला ते राजकीयदृष्टय़ा अडचणीचे ठरू शकते. यामुळेच राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांनी खेद वा दिलगिरी व्यक्त करू नये, अशी भूमिका घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा