मुंबई : जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी’ या संसर्गजन्य त्वचा रोगाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे, असे उच्च न्यायालयाने बुधवारी नमूद केले. तसेच हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली तयार करण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जात आहेत, अशी विचारणा करून त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. ‘लम्पी’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमान संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वकील असीम सरोदे आणि अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘लम्पी’ या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या गायी किंवा म्हशींच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in