लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र अनेक वेळा या प्रकल्पांमध्ये सेवा निवृत्त आणि ज्येठांच्या दृष्टीने आवश्यक अशा सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता आता महारेराने सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. ही नियमावली राज्यभर लागू करण्यात आली असून या नियमवलीचे पालन करणे विकासकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
EPF Pension Scheme Eligibility
EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे
Zopu scheme, MHADA developer, MHADA,
‘झोपु’ योजनेत म्हाडा विकासक, पहिल्यांदाच जबाबदारी; चार प्रस्ताव प्राधिकरणाकडे
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

सेवा निवृत्तीनंतर वा उतारवयात शांत, निसर्गरम्य वातावरणात वास्तव्य करण्याकडे कल वाढत आहे. तर दुसरीकडे विकासकही या घटकांसाठी स्वतंत्र प्रकल्प राबवित आहेत. मात्र हे प्रकल्प राबविताना विकासक या घटकांच्या गरजा लक्षात घेऊन सोयी-सुविधा उपलब्ध करीत नाहीत. अनेक वेळा सुविधा केवळ कागदावर असतात. यामुळे त्यांची फसवणूक होते. ही बाब लक्षात घेता आता महरेराने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी मार्गदर्शक तत्वांचा मसुदा तयार केला असून तो सूचना आणि मतांसाठी जाहीर केला होता. अनेकांनी या प्रस्तावाचे स्वागत करून अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. यात ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था आणि काही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतंत्रपणेही सूचना केल्या होत्या. या सर्व सूचनांचा समावेश करून सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या प्रकल्पाच्या नियमावलीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. ही नियमावली आता राज्यभर लागू करण्यात आली आहे.

आणखी वाचा-मुंबईच्या माजी विमानतळ संचालकांचा पत्नीसह दुर्दैवी मृत्यू; इंधनासाठी पेट्रोल पंपावर थांबले, तेवढ्यात होर्डिंग कोसळलं

सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठी किमान प्रत्यक्ष निकष / विनिर्देशांची सविस्तर नियमावली महारेराने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठी उभारण्यात येणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांच्या नियमावलीत त्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन इमारतीचे संकल्पचित्र, स्वयंपाकघर, स्नानगृह, उद््वाहन आणि रॅम्पस, जीना, छिन्नमार्ग, प्रकाश योजना आणि वायुविजन, सुरक्षा आणि सुरक्षितता आदी सुविधांबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या किमान प्रत्यक्ष निकष / विनिर्देशानुसार हे प्रकल्प बांधावे लागतील. त्यासाठी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे विकासकांना बंधनकारक आहे. ही नियमावली राज्यात लागू करण्यात आलेली आहे. आता विकासकांना या तरतुदींचा विक्री करारातही योग्य पध्दतीने समावेश करावा लागणार आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास विकासकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

आणखी वाचा-केसपेपरसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे केईएम रुग्णालय प्रशासनाला निर्देश

नियमावलीतील काही महत्त्वाच्या तरतुदी अशा…

  • एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीला उद्वाहन आवश्यक. शिवाय व्हीलचेअर किंवा तत्सम साधनांची मदत घेता येईल, अशी रचना असावी.
  • इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअरने कुठल्याही अडथळ्याशिवाय फिरता येईल असे आरेखन असावे.
  • आवश्यक तेथे रॅम्पसची व्यवस्था, त्यादृष्टीने दरवाजेही ९०० एमएमपेक्षा मोठे असावे. प्राधान्याने स्लायडिंगचे दरवाजे असल्यास उत्तमच. ४ दरवाज्याचे हँडल्स, कड्या सहजपणे व्यवस्थित पकडता येतील असे आणि दणकट असावे.
  • यातील फर्निचरही वजनाला हलके, दणकट आणि कुठल्याही अणकुचीदार टोकांशिवाय असावे.
  • सर्व उद्वाहनाला द्रृकश्रव्य व्यवस्था असावी. या उद्वाहनामध्ये व्हीलचेअर सहजपणे आतबाहेर करता यावी.
  • प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहज हालचाल करता येईल, असे एक उद्वाहन अत्यावश्यक आहे.
  • जिन्यांची रुंदी १५०० एमएमपेक्षा कमी नसावी. शिवाय जिन्याच्या दोन्ही बाजूला हँडल्स असावे. पूर्ण उघडा आणि वर्तुळाकार जिना असू नये.
  • दोन पायऱ्यांमधील अंतरही फार असू नये. जिनाही १२ पायऱ्यांपेक्षा मोठा असता कामा नये.
  • इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये कुठेही पायऱ्या असू नये. खूपच गरज असेल तर रॅम्पसची व्यवस्थाही असावी.
  • जेथे जेथे छिन्नमार्गाच्या पातळीत फरक असेल तो भाग सहजपणे लक्षात येईल अशा ठळक रंगाने दाखवावा.
  • भिंतीलगत गरजेनुसार विशिष्ट उंचीवर हँडल्सही असावेत .
  • स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा, नैसर्गिक प्रकाश आणि व्यवस्थित वायुविजन व्यवस्था असावी.
  • स्नानगृहात सहजपणे पकडता येईल असे हँडल्स वॉशबेसीन, शॉवर, शौचालयाजवळ असावे. हँडल्स दणकट असावेत.
  • शौचालयामध्ये न घसरणाऱ्या टाईल्स असाव्यात. शौचालयाचा दरवाजा बाहेर उघडणारा असावा. संकटकाळात त्याचा उपयोग होऊ शकेल.
  • इमारतीमध्ये विजेची पर्यायी व्यवस्था असावी. शिवाय प्रत्येक सदनिकेत आणि विशेषतः स्वयंपाकघरात आणि शौचालयातही विजेची पर्यायी व्यवस्था असावी .
  • इमारतीच्या परिसरात आणि विशेषतः मुख्य दरवाजा, शौचालय, शयनगृहात आणि सार्वजनिक क्षेत्रात अलार्मची स्वतंत्र बटण असावे.
  • बेड, शौचालय आणि शॉवरच्या बाजुलाही आणीबाणीच्या काळात वापरण्यासाठी अलार्मची व्यवस्था असावी.
  • सुरक्षा रक्षक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित असावे.
  • आणीबाणीकाळात संपर्क साधण्यासाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक सर्व रहिवाशांना द्यावे. शिवाय हे क्रमांक इमारतीत उद्वाहन आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही प्रदर्शित करावे.