वरळी येथील आर्याका होस्बेटकर या तरुणीवर रसायन फेकणाऱ्या लघुपट निर्माता जॉन जेरेट याला १६ नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याने आपल्या कृत्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 सायकलींग ग्रुपमधील मैत्रीण आर्याकावर  जॉन जेरेट याने बुधवारी सकाळी रसायन फेकले होते. त्यात ती जखमी झाली होती. या घटनेनंतर फरार झालेल्या जॉनला नालासोपारा येथून शनिवारी अटक करण्यात आली. जॉनला रविवारी भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. आर्याकावर फेकण्यासाठी त्याने १०० रुपयांना मस्जिद बंदर येथून दोन बाटल्या खरेदी केल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.  आर्याकाशी लग्न करता यावे यासाठी २० ऑक्टोंबरला पत्नीला घटस्फोट देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. एवढे करुनही आर्याका लग्नासाठी टाळाटाळ करत होती म्हणून हे कृत्य केल्याची कबुली जॉनने  पोलिसांकडे दिली.
त्याचे इतर महिलांशी संबंध होते का तसेच त्याच्या संगणकातील हार्ड डिस्कमध्ये इतर काय मजकूर आहे,त्याचा शोध आता पोलीस तपासात घेतला जाणार आहे.       

Story img Loader