लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: मराठी नाटक आंतरराष्ट्रीय रंगमंचावर नेण्यात मोठे योगदान असलेले ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या ‘ठकीशी संवाद’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फे शनिवारी सायंकाळी ६ वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृह, आरे रोड, गोरेगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध साहित्यिक अशोक शहाणे यांच्या हस्ते ‘ठकीशी संवाद या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी या पुस्तकाचे ७५ मिनिटे अभिवाचन करण्यात येणार आहे.

आशयघन नाटके आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या आळेकर यांची अभिनेता, नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, लेखक अशी ओळख आहे. ‘मिकीमाऊस आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’,‘बेगम बर्वे’या नाटकांनी आळेकर यांना नाटककार म्हणून वेगळी ओळख दिली. याशिवाय आळेकर यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, तसेच पद्मश्री किताब देत सन्मानित करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Release of the book thakishi samvad by veteran playwright satish alekar on saturday mumbai print news mrj
Show comments