लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १०३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपचे नेते मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध दाखल फसवणुकीचे प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा सीबीआयने दाखल केलेला अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी स्वीकारला. त्यामुळे, कंबोज यांना दिलासा मिळाला आहे.

Odisha army officers fiance sexual assault news
लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जण निलंबित
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
BJP MLA Munirathna Naidu
BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?
supreme Court on Kolkata Rape case
Kolkata Rape and Murder : कोलकाता पीडितेच्या हत्येआधीचे काही तास कसे होते? सहकाऱ्यांनी काय सांगितलं?
court ordered police custody to 12 suspects in vanraj andekar murder case
’वनराज आंदेकर खून प्रकरणाचा सखोल तपास गरजेचा’- न्यायालायचे निरीक्षण; १२ जणांना कोठडी
case has been registered against two people due to filming done before the suicide
आत्महत्येपूर्वी केलेल्या चित्रीकरणामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
BKC, Mumbai police, case aginst Congress workers, protest, PM Narendra Modi, Mumbai, Varsha Gaikwad, black flags, pm narendra modi bkc visit, Mumbai news,
बीकेसी आंदोलनप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

सीबीआयने केलेला तपास अपूर्ण आहे. किंबहुना, तो पुरेसा नसल्याची टिप्पणी करून अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल सुरुवातीला फेटाळला होता. तसेच, तपास यंत्रणेने प्रकरणाचा पुढील तपास करून योग्य तो अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला सीबीआयने विशेष न्यायालयात आव्हान दिले होते. विशेष न्यायालयाने सीबीआयचे अपील योग्य ठरवले. तसेच, प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा सीबीआयचा अहवाल फेटाळण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

आणखी वाचा-बदलापूर-नवी मुंबई प्रवास २० मिनिटांत! ‘एमएमआरडीए’ बांधणार विमानतळ प्रवेश नियंत्रण मार्ग

या पार्श्वभूमीवर, महानगरदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी याप्रकरणी निर्णय देताना कंबोज आणि इतरांविरुद्ध दाखल फसवणुकीचे हे प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा सीबीआयने दाखल केलेला अहवाल स्वीकारला.

दरम्यान, टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या कंबोज आणि इतर आरोपींनी क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची १०३ कोटी रुपयांची फसवणूक केली, असा सीबीआयचा आरोप होता. परंतु, कंपनी आणि तिच्या संचालकांवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आढळून आलेले नाहीत, असा दावा करून सीबीआयने प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र, आरोपींनी गुन्हेगारी कट रचून फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत होते. आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे राष्ट्रीयीकृत बँकेची अनुक्रमे नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून त्याचा दुरुपयोग केला, असे कनिष्ठ न्यायालयाने सीबीआयचा अहवाल फेटाळताना नमूद केले होते.