मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशचे (एमएमआरसी) नियोजन आहे. त्यानुसार एकीकडे या मेट्रो मार्गिकेचे बांधकाम वेगात सुरु असून दुसरीकडे तांत्रिक कामांना आणि मेट्रो गाड्या मुंबईत दाखल करून त्यांच्या चाचण्या घेण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईत पाच गाड्या दाखल झाल्या असून उर्वरित चार गाड्या दोन टप्प्यात मुंबईत दाखल होणार आहेत. सप्टेंबरमध्ये दोन तर नोव्हेंबरमध्ये दोन गाड्या आरे कारशेडमध्ये येतील.

हेही वाचा >>> Jaipur-Mumbai Express Firing : चेतन सिंहने गोळीबार का केला? लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणाले…

Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Mumbi Cab Driver Arrested
Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

एमएमआरसी ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेचे काम सुरु आहे. दोन टप्पात हे काम करण्यात येत असून यातील बीकेसी ते सीप्झ हा टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये तर बीकेसी ते कुलाबा टप्पा २०२४ मध्ये सुरु करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यामुळेच या टप्प्याच्या आणि आरे कारशेडच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या टप्प्यासाठी लागणाऱ्या मेट्रो गाड्या आंध्र प्रदेशातून मुंबईत आणून त्यांची चाचणी घेण्याच्या कामालाही प्राधान्य देण्यात येत आहे. या संपूर्ण मार्गिकेसाठी एकूण ३१ मेट्रो गाड्यांची आवश्यकता आहे. त्यानुसार या गाड्यांची बांधणी करण्याचे कंत्राट एमएमआरसीकडून श्रीसिटीतील एका कंपनीला २०१७-२०१८ मध्ये देण्यात आले. २५१६ कोटींचे हे कंत्राट आहे. त्यानुसार श्रीसिटीतून आतापर्यंत पाच मेट्रो गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा >>> वांद्रे-वरळी सी-लिंकवरून थेट खोल समुद्रात उडी, नौदल आणि तटरक्षक दलाकडून शोधमोहीम सुरू

एकूण ३३.५ किमीसाठी ३१ गाड्यांची आवश्यकता असली तरी पहिल्या टप्प्यासाठी मात्र नऊ गाड्यांचीच आवश्यकता आहे. त्यानुसार नऊ गाड्यांची बांधणी प्राधान्यक्रमाने करुन घेत वर्षभरापूर्वी, ऑगस्टमध्ये पहिली मेट्रो गाडी मुंबईत आणण्यात आली. त्यानंतर एक-एक करत आणखी चार गाड्या आणण्यात आल्या आहेत. सध्या पाच मेट्रो गाड्या मुंबईतील कारशेडमध्ये दाखल असून त्यांच्या नियमित चाचण्या सुरु असल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पहिल्या टप्प्यासाठी आणखी चार गाड्यांची आवश्यकता आहे. त्या चार गाड्या शक्य तितक्या लवकर मुंबईत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सप्टेंबरमध्ये दोन तर नोव्हेंबरमध्ये दोन अशा या चारही गाड्या मुंबईत येतील. एकूणच नऊ गाड्या दाखल झाल्यास पहिला टप्पा सुरु करण्याचा मार्ग मोकळा होईल असेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरु असून डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू होऊ शकेल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader