मुंबई : धारावी पुनर्विकासात निर्माण होणाऱ्या हस्तांतरणीय विकास हक्काची (टीडीआर) सक्ती करणाऱ्या शासनाने या बदल्यात चटईक्षेत्रफळ वापरावरील निर्बंध उठवावे आणि चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात सवलत द्यावी, अशी मागणी कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन (क्रेडाई) व महाराष्ट्र चेंबर्स ॲाफ हौसिंग इंडस्ट्रीज (एमसीएचआय) या विकासकांच्या संघटनेने केली आहे.

विकासकांची ही मागणी मान्य होण्याची शक्यता नसली तरी याद्वारे विकासकांनी एक प्रकारे धारावी टीडीआरच्या सक्तीचा विरोधच केल्याचे दिसून येते. धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाची नियुक्ती करण्याबरोबरच शासनाने टीडीआरची मक्तेदारी निर्माण केल्यामुळे विकासकांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र उघडपणे कुणी विकासक बोलायला तयार नाही.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Rent free office space in Mhada Bhawan to developer in vangani
वांगणीतील विकासकावर ‘म्हाडा’ची कृपादृष्टी?
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Redevelopment, Kamathipura, BMC, MHADA
कामाठीपुराचा पुनर्विकास ‘म्हाडा’ऐवजी पालिकेकडे ? विशिष्ट विकासकाच्या आग्रहामुळे निर्णय
Process of house sale by developer without lot Mumbai news
सोडतीविनाच विकासकाकडून घरविक्रीची प्रक्रिया?

हेही वाचा – मुंबई : विरार – बोळीजमधील घरांसाठी ६९१ अर्ज, सूर्याचे पाणी आल्यानंतर प्रतिसाद वाढण्यास सुरुवात

धारावीत निर्माण होणारा टीडीआर प्रत्येक बांधकामात ४० टक्क्यांपर्यंत वापरणे बंधनकारक करण्याबरोबरच रेडी रेकनरच्या ९० टक्क्यांपर्यंत टीडीआरचा दर निश्चित करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे खळबळ माजली आहे. टीडीआरचा प्रचलित दर ४० ते ६० टक्के आहे. या अधिसूचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. यावर हरकतीची सूचना सादर करताना विकासकांच्या संघटनेने ही मागणी केली आहे.

१९९७ मध्ये झोपडपट्टी पुनर्विकासात निर्माण होणारा २० टक्के टीडीआर विकासकांना बंधनकारक करताना चटईक्षेत्रफळावरील निर्बंध काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अमर्याद चटईक्षेत्रफळ टीडीआरच्या स्वरूपात वापरणे विकासकांना शक्य झाले होते. आताही धारावी टीडीआरची सक्ती करताना चटईक्षेत्रफळावरील निर्बंध उठविण्याची मागणी विकासकांच्या संघटनेने केली आहे. केवळ चटईक्षेत्रफळावरील निर्बंध नव्हे तर फंजीबल चटईक्षेत्रफळ तसेच अतिरिक्त चटईक्षेत्रफळापोटी आकारल्या जाणाऱ्या अधिमूल्यात सवलत द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. चटईक्षेत्रफळावरील अधिमूल्यात सवलत मिळावी, अशी विकासकांची जुनी मागणी आहे. याबाबत शासन विचार करीत असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मध्यंतरी विकासकांच्या कार्यक्रमातही सांगितले होते. धारावी टीडीआरची सक्ती आहे तर मग अधिमूल्यात तरी सवलत द्या, अशी मागणी विकासकांकडून रेटली जात आहे.

हेही वाचा – दीड हजार बालकांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया रखडल्या! वयोमर्यादा वाढविण्यात केंद्राकडून उदासीनता…

याचा अर्थ असा आहे की, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत जितके चटईक्षेत्रफळ निर्माण होते ते संपूर्ण वापरता येते. मात्र इतर योजनांमध्ये ते शक्य नसते. चटईक्षेत्रफळ वापरावर निर्बंध आहेत. धारावी टीडीआर ४० टक्के वापरण्याची सक्ती करताना हे निर्बंध उठवले तर हा टीडीआर महाग ठरणार नाही, असे या घडामोडींशी संबंधित एका विकासकाने सांगितले. सध्या शहर व उपनगरात दोन ते अडीचपर्यंत तर म्हाडा पुनर्विकासात तीन ते चार तसेच झोपडपट्टी व समूह पुनर्विकासात चारपर्यंत चटईक्षेत्रफळ आहे.

टीडीआर म्हणजे काय?

भूखंड विकसित करताना निर्माण झालेले चटईक्षेत्रफळ संबंधित भूखंडावर वापरता येणे शक्य नसते तेव्हा ते अन्यत्र वापरण्याची मुभा ‘टीडीआर’च्या स्वरूपात दिली जाते. टीडीआर प्रमाणपत्र स्वरुपात दिले जाते. प्रचलित धोरणानुसार टीडीआर आता कुठेही वापरता येतो. मात्र त्याचे इंडेक्सेशन केले जाते. म्हणजे ज्या परिसरांत टीडीआर वापरायचा आहे तेथील रेडी रेकनरच्या दराशी सांगड घातली जाते. त्यामुळे शहरात कमी तर उपनगरात जास्त टीडीआर मिळतो. धारावी टीडीआरबाबत इंडेक्सेशन रद्द केल्यामुळे शहर व उपनगरात सारखा वापरता येईल. मात्र उपनगरात तो खूपच महाग असेल.