मुंबई : देवनार कचराभूमीलगतच्या शाही नाका परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानाची नियमित देखरेख व डागडुजीअभावी दुर्दशा झाल्याचे निदर्शनास आले होते. कंत्राटदाराने पालिकेच्या निविदेतील अटी व सूचनांचे केलेले उल्लंघन आणि कामातील हलगर्जीपणामुळे या उद्यानाची दुर्दशा झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, पालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली असून उद्यानाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.

गेल्या वर्षी संबंधित उद्यानाचे स्थानिक आमदार अबू आसिम आझमी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले होते. उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पालिकेने निविदा जारी केली होती. महानगरपालिकेने निविदा प्रक्रियेअंती हर्षिल इंटरप्राइजेस या कंपनीची उद्यानाच्या देखभालीसाठी निवड केली. मात्र, कंत्राटदार उद्यानाच्या देखभालीचे काम योग्यरीत्या करीत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होता. तसेच पालिका अधिकारीही कंत्राटदाराच्या कामांवर देखरेख करीत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. दरम्यान, समाजकंटकांनी उद्यानातील विविध सुविधांची तोडमोड केली. मात्र, त्याकडेही प्रशासनाचे लक्ष नव्हते. उद्यानात लावण्यात आलेल्या झुडपांना दररोज पाणी न घातल्यामुळे सर्व उद्यान उजाड झाले आहे.

Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
E-waste transportation, Navi Mumbai,
नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ

हेही वाचा – चेंबूरमधील पर्यायी रस्त्याचे बांधकाम रखडले, वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच जटील

लहान मुलांचे झोपाळे चोरांनी गायब केले आहेत. तसेच घसरगुंडीही तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे मुलांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी बांधलेल्या गॅझेबो आणि आसन व्यवस्थेचीही दुरवस्था झाली आहे. उद्यानात उभारण्यात आलेले पथदिवे मागील अनेक महिन्यांपासून बंद असून आता ते मोडकळीस आले आहेत. शिवाय उद्यानाच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. दै. ‘लोकसत्ता’मध्ये १९ फेब्रुवारी रोजी संबंधित वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेने कंत्राटदारावर नोटीस बजावून ८,८०० रुपये दंड ठोठावला.

हेही वाचा – मुंबई : अक्सा समुद्रकिनाऱ्यावरील समुद्री भिंतीच्या बांधकामाला स्थगिती

लहान मुले व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन पालिकेने येथे सुरक्षारक्षक नेमावा, तसेच उद्यानातील उर्वरित डागडुजीची कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली आहे.