सनदी अधिकाऱ्यांकडून बहुमताच्या जोरावर ठराव
भाडय़ाने फ्लॅट देऊन सेवानिवासस्थानात राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध गृहमंत्री आर आर पाटील यांनी नेहमीप्रमाणे दंड थोपटले असले तरी प्रत्यक्षात काहीही होणार नाही, याची सर्वानाच खात्री आहे. सरकारी मदतीने मिळालेल्या सदनिकेद्वारे लाखाहून अधिक भाडे घेणारे सनदी अधिकारी सोसायटीला मात्र देखभाल खर्चापोटी फक्त दहा रुपये भरत असल्याचे उघड झाले आहे.
सहकार कायदा आणि सोसायटी उपविधीप्रमाणे एखाद्या सदस्याने घरात भाडेकरू ठेवला तर देखभाल खर्चाच्या दहा टक्के शुल्क अतिरिक्त आकारले जाते. परंतु सनदी अधिकाऱ्यांच्या वर्सोवा लिंक रोडवरील संगम सोसायटीत फक्त दहा रुपये शुल्क आकारले जाते. या सोसायटीत एकूण ३२ सदस्य असले तरी फक्त दोन-तीन सदस्य वगळता उर्वरित सनदी अधिकाऱ्यांचे फ्लॅट भाडय़ाने देण्यात आले आहेत. या फ्लॅटच्या भाडय़ापोटी ८० हजार ते सव्वा लाख रुपये संबंधित सदस्यांना मिळत आहेत. परंतु देखभाल खर्चाच्या दहा टक्के रक्कमही भरण्याची या सनदी अधिकाऱ्यांची तयारी नसल्याचे दिसून येते. हे सनदी अधिकारी प्रत्यक्षात राहत नसले तरी त्यांचे बहुमत असल्यामुळे त्या जोरावर फक्त दहा रुपये शुल्क आकारण्याचा ठराव मंजूर करून घेतल्याचे कळते.
शासनाकडून अल्प दरात भूखंड वितरीत केला जातो. या भूखंडाचा १५ टक्के व्यापारी वापर करता येत असल्यामुळे सनदी अधिकाऱ्यांना आपले घर जवळपास मोफत वा खूपच कमी किमतीत पदरी पडते. हक्काचे घर मिळाल्यानंतर सेवानिवासस्थान सोडावे लागते. परंतु त्याऐवजी हे सनदी अधिकारी हक्काचे घर भरमसाठ भाडय़ाने देऊन टाकतात. सरकारी भूखंडावर उभ्या राहिलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या सर्वच सोसायटय़ांमध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे. गृहमंत्र्यांनी जाहीर भाषणात यावर प्रकाश टाकला असला तरी कारवाई होण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जाते.  सांगितले.
कोकणात सध्या वादळी पावसाच्या सरी पडत आहेत. मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागातही या पावसाच्या सरींनी हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्य़ात पन्हाळा तालुक्यात वीड पडून एका शेतक ऱ्याचा मृत्यू झाला, तर महिला जखमी झाली. महाबळेश्वर येथे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३७ मिलिमीटर पाऊस बरसला.
याशिवाय सातारा (२८ मिलिमीटर), नगर (१७) येथेही चांगल्या पावसाची नोंद झाली. याशिवाय इतरत्र पडलेला पाऊस असा (मिलिमीटरमध्ये)- पुणे, ७, कोल्हापूर ९, सांगली २, रत्नागिरी ०.६, पणजी ९, भीरा ५, अमरावती २.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगम सोसायटीतील सनदी अधिकारी
राजीव अग्रवाल, यूपीएस मदान, सुनील सोनी, ए. बी. कुलकर्णी, भगवान सहाय, पी. एस. मीना (सर्व आयएएस) अरुप पटनाईक, राज खिलनानी, अहमद जावेद, मीरा बोरवणकर, राकेश मारिया, राहुल सूर, सतीश माथूर, गुलाब पोळ (सर्व आयपीएस), डी. शिवानंदन, पी. के. जोशी, पी. एस. नारायणस्वामी, पी. व्ही. जोशी, आर. टी. राठोड, एस. डी. पारधी, ए. के. अंकोला, व्ही. एन. देशमुख, ए. एल. वर्मा, राजेंद्र सिंग  (सर्व निवृत्त).

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rent more than lakh but society charges is only rs
Show comments