मुंबई : पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या ११ इमारतींमधील २,४१७ घरांच्या दुरुस्तीसाठी ११ निविदा सादर झाल्या असून निविदा प्रक्रियेअंती तातडीने कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात येणार आहेत. त्यानंतर तात्काळ घरांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून ही कामे सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. परिणामी, पात्र विजेत्या गिरणी कामगारांना येत्या काही महिन्यांमध्ये आपल्या घराचा दाबा मिळू शकणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील पनवेलमधील कोन येथील २,४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली होती. सोडतीनंतर मुंबई मंडळाने विजेत्या गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती सुरू करून ८०० हून अधिक कामगारांकडून घरांची रक्कमही भरून घेतली. मात्र या पात्र विजेत्यांना घरांचा ताबा मिळू शकलेला नाही. या घरांच्या दुरुस्तीवरून वाद सुरू झाल्याने ताबा रखडला होता. हा वाद मिटवून मंडळाने ११ इमारतींच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या होत्या.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही

हेही वाचा >>> पवार-फडणवीस शाब्दिक चकमक; ओबीसींचा मुद्दा, तत्कालीन पुलोद सरकारवरूनही आरोपांची राळ

मात्र ११ पैकी केवळ तीनच इमारतींच्या दुरुस्तीच्या निविदांना प्रतिसाद मिळाला होता. परिणामी, दुरुस्ती पुन्हा लांबणीवर पडली होती. त्यामुळे मंडळाने पुन्हा आठ इमारतींच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या. अखेर या आठ इमारतींच्या दुरुस्तीच्या कामासाठी प्रतिसाद मिळाला आणि आता या निविदा प्रक्रियेला अंतिम रुप देण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १० ते १२ दिवसात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात येतील, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कार्यादेश दिल्यानंतर तात्काळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.