|| रसिका मुळ्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुण्यातील संशोधकाचे पर्यावरणपूरक योगदान

प्लास्टिक, थर्माकोलचे विघटन होत नसल्यामुळे राज्यभर करण्यात आलेली प्लास्टिकबंदी अद्यापही वादात अडकलेली असताना प्लास्टिक आणि थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांची पैदास पुण्यातील एका संशोधकाने केली आहे. त्यामुळे पुढील काळात प्लास्टिक विघटनाची चिंता पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे.

वर्षांनुवर्षांची सवय झालेल्या प्लास्टिकऐवजी दुसरा पर्याय सापडत नाही आणि प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या हानीवर उतारा नाही, या पेचावर निसर्गानेच उत्तर दिले आहे. प्लास्टिक खाणाऱ्या अळ्यांचा शोध लागला आहे. मेणअळी किंवा अगदी घराच्या धान्यात होणाऱ्या पाखरांच्या अळ्याही प्लास्टिक खातात. याच जातकुळीतील अळ्यांबाबत परदेशी संशोधकांचे शोधनिबंध काही दिवसांपूर्वी देशभर गाजले. मात्र त्यापूर्वीच गेल्या तीन वर्षांपासून डॉ. राहुल मराठे यांनी या अळ्यांची जवळपास बारावी पिढी प्लास्टिकच्या खुराकावर जोपासली आहे.

प्लास्टिक विघटन कसे होते?

अळ्या प्लास्टिकमधील पॉलिमर हा घटक खाऊन पचवतात. प्लास्टिकच्या एका पिशवीचे विघटन होण्यासाठी १० वर्षे लागतात तिथे साधारण ५० अळ्या एक पिशवी चार दिवसांत नष्ट करतात. अळ्यांची विष्ठा ही खत म्हणून वापरता येते. पुण्यातील जिज्ञासा या शाळेत सध्या या खतावर पालेभाज्याचे मळे फुलत आहेत. ‘‘या अळ्या प्लास्टिक खातात, त्यांच्यापासून काही कृमींची पैदास करता येते जे शेतीसाठी उपयोगी आहेत. शिवाय अळ्यांची विष्ठा हे एक खत आहे. अशा या अळ्यांपासून तुम्ही अनेक गोष्टी मिळवू शकता,’’ असे डॉ. मराठे सांगतात.

घरच्या घरी प्लास्टिक विघटन

निसर्गात, खुल्या जागेत या अळ्यांना सोडून प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी काही अडचणी आहेत. ‘‘अळ्या सोडता येतील. मात्र त्याचा परिणाम हा मधमाश्यांची पोळी आणि मधाच्या उत्पादनावर मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो. मात्र नियंत्रित वातावरणात, अगदी घरगुती स्वरूपात, ही या अळ्यांची पैदास करून घरातले, सोसायटीतील प्लास्टिक नष्ट करता येऊ  शकते. अळ्यांना प्रखर प्रकाश चालत नाही. शिवाय पक्षी, पाली यांच्यापासून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे असते. मात्र पिंजऱ्यात त्याची पैदास करता येऊ शकते,’’ असे डॉ. मराठे यांनी सांगितले.

शोध कसा लागला?

डॉ. मराठे यांची मित्रकिडा ही संस्था चांगल्या कीटकांची निर्मिती आणि उपयोग यांच्यासाठी काम करते. उसाच्या शेतीवर पडणाऱ्या किडीला उत्तर म्हणून काही कृमींची पैदास करण्यासाठी या अळ्या डॉ. मराठे यांनी पाळल्या होत्या. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या अळ्या दोन-चार दिवसांत पिशवी फस्त करून पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून डब्याला नायलॉनची जाळी लावून या अळ्या ठेवल्या. तेव्हा या अळ्यांनी नायलॉनची जाळीही खाऊन टाकली. त्यानंतर सुमारे तीन वर्षांपूर्वी जीवशास्त्र (इंटेमोलॉजी) यांचे अभ्यासक असलेल्या डॉ. मराठे यांनी या अळ्यांवर संशोधन सुरू केले.

अळ्या कुठून येतात?

दोन प्रकारच्या अळ्या प्लास्टिक खातात. मेणअळी ही मध आणि मधमाश्यांच्या पोळ्यातील मेणावर गुजराण करते. मात्र त्या प्लास्टिक, थर्माकोलाही पचवू शकते. दुसऱ्या प्रकारची अळी ही धान्यात होते. या अळ्यांची पैदास करताना त्यांचे परिणामही पाहणे आवश्यक ठरते. त्यादृष्टीने काही अळ्यांना प्लास्टिक खायला दिले गेले तर काहींना मध आणि मेण खाण्यास देण्यात आले. मात्र या अळ्यांच्या विष्ठेत आणि जीवनमानात फरक आढळला नाही, असे डॉ. मराठे यांनी सांगितले.