मुंबई : मेंदूत कर्करोगाची गाठ (ब्रेन ट्युमर) असलेल्या लहान मुलांना उपचारानंतर स्मृतिभ्रंशाच्या समस्येचा सामना करावा लागतो. ती दूर करण्याच्या उद्देशाने टाटा रुग्णालयाने संशोधन करण्यास सुरुवात केली असून १८ वर्षांखालील मुलांवर चाचण्या केल्या जात आहेत. पुढील दोन वर्षांमध्ये हे संशोधन पूर्ण होण्याची आशा आहे.

लहान मुलांमध्ये रक्ताच्या कर्करोगानंतर मेंदूतील कर्करोगाच्या गाठीचे प्रमाण अधिक आहे. या आजाराने ग्रस्त लहान मुलांवर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात. मात्र, यात किरणोत्सर्गामुळे मेंदूतील पेशी नष्ट होत असल्याने अनेक लहान मुलांमध्ये स्मृतिभ्रंशाची समस्या उद्भवते.

stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा >>> फलकबाजी… टोलेबाजी; मुंबईत महाकाय फलकांद्वारे राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ

यासाठी टाटा रुग्णालयाने काही दिवसांपासून संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्मृतिभ्रंश आणि डिमेंशिया यासारख्या स्मृतीशी संबंधित आजारावर मेमेंटीन हे औषध गुणकारी ठरत आहे. त्यामुळे, याचा वापर लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश दूर करण्यासाठी कितपत उपयोगी ठरू शकेल, यावर संशोधन करण्यात येत असल्याची माहिती टाटा रुग्णालयातील ‘रेडिओ ऑन्कोलॉजी’ विभागाचे प्राध्यापक व सल्लागार डॉ. तेजपाल गुप्ता यांनी दिली.

हेही वाचा >>> बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

संशोधन असे

● फेब्रुवारी २०२४ पासून या संशोधनाला सुरुवात झाली. पुढील दोन वर्षांत १०२ मुलांवर ही चाचणी करण्यात येईल. आजवर २२ ते २४ मुलांवर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.

● या चाचणीसाठी मुलांची दोन गटांत विभागणी केली आहे. एका गटातील मुलांना मेमेंटीन हे औषध दिवसांतून दोन वेळा दिले जात आहे, तर दुसऱ्या गटातील मुलांवर नियमित उपचार सुरू आहेत.

● आजवर मेमेंटीन दिलेल्या मुलांमध्ये काही सकारात्मक परिणाम दिसत आहेत. मात्र, संशोधन पूर्ण झाल्याशिवाय त्याबाबत काहीही मत मांडता येणार नसल्याचे सांगण्यात आले.

पाच वर्षे संशोधन निवड करण्यात आलेल्या १८ वर्षांखालील मुलांवर मेमेंटीन औषधाची मात्रा सुरू करण्यापूर्वी त्यांची स्मृती तपासण्यात येईल. संशोधन पाच वर्षे चालेल. चाचणी सुरू करण्यापूर्वी, त्यानंतर सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे आणि पाच वर्षांनी त्यांच्या स्मृतीची तपासणी करून निष्कर्ष काढण्यात येतील.

Story img Loader