मुंबई : चेंबूरमधील प्रयाग नगर परिसरातील सिमेंट मिक्सर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत होते. परिणामी, नागरिकांच्या तक्रारीनंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला होता. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा एकदा हा प्रकल्प सुरू करण्यास संबंधित कंपनीला परवानगी दिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मंडळाने तत्काळ ही परवानगी रद्द करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> झोपु योजनेतील प्रत्येक सदनिका आधार कार्डाशी जोडणार!

चेंबूरमधील माहुल गाव, गडकरी खाण आणि वाशी नाका परिसरातील विविध सरकारी तेल कंपन्यांमुळे या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.  त्यातच याच भागातील प्रयाग नगर येथे पाच ते सहा वर्षांपूर्वी एका खाजगी भूखंडावर सिमेंट मिक्सर प्रकल्प उभारण्यात आला होता. या सिमेंट प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले होते. शिवाय या प्रकल्पामुळे हवेत उडणाऱ्या सिमेंटमुळे अनेक नागरिकांना घशाचा, तसेच श्वसनाचा त्रास होत होता. या परिसरातील नागरिकांनी वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा प्रकल्प बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या तीन वर्षापासून हा प्रकल्प बंद होता.  काही दिवसांपूर्वी संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीच्या नावाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रकल्प सुरू करण्याची परवानगी मागितली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक नागरिकांना विचारात न घेताच परवानगी देऊन टाकली. ही बाब स्थानिक रहिवाशांना समजतात त्यांनी हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास कडाडून विरोध केला आहे. हा प्रकल्प सुरू  करण्यासाठी दिलेली परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून केली आहे.  अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा शिंदे यांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents angry over re permission to close cement plant in chembur mumbai print news zws