लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने कुर्ला रेल्वे स्थानकाजवळील गांधी मैदानातील विकास कामांना नुकतीच सुरुवात केली असून येत्या वर्षभरात ही विकास कामे पूर्ण होतील असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर कुर्लावासीयांना एक उद्यान उपलब्ध होणार आहे.

incomplete work of first phase of concreting road complete by may 2025
सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मे २०२५ ची मुदत; कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
traffic route changes in nagpur
नागपूर : ‘लाडक्या बहिणी’च्या सुरक्षेसाठी ‘या’ मार्गांवर राहणार बंदी…
St Ursula School student safety issue due to negligence of traffic police Nagpur news
‘सेंट उर्सुला’च्या विद्यार्थिनीचा जीव मुठीत, पालकांना कशाची वाटते भीती?
Umele residents, Umele survey, private land Umele ,
वसई : नव्या सर्वेक्षणात उमेळेवासियाना दिलासा, रेल्वे भूसंपादनात खासगी जागेला वगळले
Kharkopar to Uran railway line, Cleaners employment,
स्थानक सफाईवरून रेल्वे-सिडको यांच्यात टोलवाटोलवी, सफाई कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत
badlapur protest
Badlapur School Case : “फास्ट ट्रॅक कोर्ट नको, आरोपीला आजच भरचौकात…”, बदलापूर स्थानकात आंदोलकांच्या मागणीला जोर!
High Court order to traffic police regarding traffic outside Bandra East station Mumbai
वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील वाहतूक कोडींवर तातडीने मार्ग काढा; नागरिकांच्या गैरसीयीची दखल घेऊन उच्च न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश

कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या एस. जी. बर्वे मार्गावरील गांधी मैदानाचा विकास करण्यात येणार आहे. ३५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या मैदानात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. कुर्ला रेल्वे स्थानकालगतच्या बस आगाराच्या पाठीमागे असलेला हा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होता. देखभालीअभावी तेथे अतिक्रमण झाले होते. गांधी मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कुर्ला येथील नागरिकांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा भूखंड महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता या मैदानाचे सुशोभिकरण आणि विकास करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३: अर्ज करण्यासाठी अखेरचे दोन दिवस, आतापर्यंत २८ हजार अर्ज सादर

या उद्यानात सुशोभीकरणासोबतच पदपथ, संरक्षक भिंत, संरक्षक जाळ्या, बैठक व्यवस्था, पर्जन्य जलवाहिन्या, स्वच्छतागृह, दिव्यांची रोषणाई, कचरपेटी, हिरवळ आदी कामे करण्यात येणार आहे. तसेच क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, मल्लखांब, कुस्ती अशा खेळांसाठीही तेथे व्यवस्था करण्यात येणार आहे. ११ महिन्यांत मैदानाचा विकास करण्यात येणार आहे.