मुंबई: म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून बृहतसुचीवरील २६५ पात्र अर्जदारांसाठीच्या संगणकीय सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. २८ डिसेंबरला दुपारी १ वाजता म्हाडाच्या वांद्र्यातील मुख्यालयात ही संगणकीय सोडत काढण्यात येणार असून त्यासाठी ४०० घरे उपलब्ध आहेत. बऱ्याच वर्षांनंतर काढण्यात येणाऱ्या या सोडतीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या २६५ भाडेकरूंचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या वा जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते. ज्या ज्या इमारतीचा जसा जसा पुनर्विकास होतो तसे तसे संबंधित रहिवासी हक्काच्या घरात स्थलांतरीत होतात. मात्र त्याचवेळी असे काही रहिवासी असतात त्यांच्या इमारतीचा वर्षानुवर्षे पुनर्विकास होत नाही किंवा भविष्यातही कधी करण्याचे नियोजन नसते. अशा रहिवाशांना संक्रमण शिबिरातच रहावे लागते. आजही ३० ते ४० वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहात आहेत. अशा संक्रमण शिबिरार्थींना हक्काचे घर देण्यासाठी रहिवाशांची यादी, अर्थात बृहत सूची तयार करून त्यांच्याकडून अर्ज घेतले जातात. दुरुस्ती मंडळाला पुनर्विकासातून उपलब्ध होणारी घरे रहिवाशांना सोडतीद्वारे वितरित केली जातात. या बृहत सूचीच्या माध्यमातून आतापर्यंत दुरुस्ती मंडळाकडून अनेक रहिवाशांना घरे देण्यात आली आहेत. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याच्या आरोपामुळे म्हाडाने बृहत सूचीसाठी नवीन धोरण तयार केले आहे.

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

हेही वाचा… निर्णय लांबणीवर; मराठा आरक्षण : क्युरेटिव्ह याचिकेवर आता २४ जानेवारीला सुनावणी

म्हाडाच्या नवीन धोरणानुसार आता बृहत सूचीवरील घरांसाठी संगणकीय (ऑनलाईन) सोडत काढली जाणार आहे. तर ३०० चौरस फूटापेक्षा कमी क्षेत्रफळातील जुन्या रहिवाशांना ३०० ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर वितरित केले जाणार आहे. ३०१ ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाचे जुने घर असलेल्या रहिवाशांना ४०० ते ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर वितरित केले जाणार आहे. ४०१ ते ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे जुने घर असलेल्या रहिवाशाला ५०० ते ६०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर वितरित केले जाणार आहे. ५०१ ते ६०० चौरस फूट क्षेत्रफळाचे जुने घर असलेल्या रहीवाशाला ६०० ते ७०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर दिले जाणार आहे. ६०१ ते ७०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या घराऐवजी ७०० ते ७५३ चौरस फूट क्षेत्रफळाचे घर दिले जाणार आहे. तसेच ७०१ व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाचे जुने घर असलेल्या रहिवाशांना ७५३ चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतचे घर वितरित केले जाणार आहे. या नवीन धोरणानुसार आता अखेर पहिली सोडत काढली जाणार आहे.

बृहत सुचीवरील ४०० घरांसाठी आणि २६५ अर्जदारांसाठी २८ डिसेंबरला सोडत काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. संगणकीय पद्धतीने निघणारी ही पहिली सोडत आहे. या सोडतीमुळे बृहत सूची प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून गैरप्रकाराला आळा बसणार आहे असा दावाही त्यांनी केला आहे.