मुंबई: जुहू कोळीवाडा येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला तेथील स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. जुहू कोळीवाड्याचे सीमांकन झाले असून तेथे झोपू योजना लागू होत नाही, असे सांगून आमदार अमित साटम यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलिसांना पत्र लिहून बिल्डर आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जुहू कोळीवाडा येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या एका झोडपट्टी पुनर्वसन योजनेला स्थानिक राहिवाशांनी विरोध केला आहे. या प्रकरणी विकासक धमकावत असल्याची व दिशाभूल करीत असल्याची तक्रार रहिवाशांनी आमदार अमित साटम यांच्याकडे केली होती. त्यानुसार साटम यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलिसांना पत्र लिहून बिल्डर आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Union Budget has announced various incentive schemes for textile industry including Cotton Campaign
केंद्रीय अर्थसंकल्पाने वस्त्रोद्योगाचे धागे सुखावले, कापूस अभियानासह प्रोत्साहनपर विविध योजना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
lokmanas
लोकमानस: महागड्या गृहसंकुलांतही तेच…
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
ulta chashma
उलटा चष्मा: कोण म्हणतं गरीब जिल्हा?
Mumbai Municipal Corporation will levy property tax on commercial slums to boost Revenue starting surveys
झोपडपट्यामधील व्यावसायिक गाळेधारक मालमत्ता कराच्या कक्षेत सुमारे ६०० झोपड्यांना पाठवली देयके
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी

हेही वाचा >>>दोन मुलींवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जुहू कोळीवाड्याचे सीमांकन झाले असून तेथे झोपू योजना लागू होत नाही. सरकार गावठाण आणि कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करत आहे. तथापि, एक विकासक दिशाभूल करत आहे आणि स्थानिक रहिवाशांना धमकावून झोपू योजना तिथे प्रस्तावित करत आहे, असे साटम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. जुहू कोळीवाड्यात खोटे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही लोकांकडून जबरदस्तीने हमीपत्रे घेतली आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे साटम यांनी म्हटले आहे.

साटम पुढे म्हणाले की, भूखंडावरील झोपू योजनेला स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. सीमांकन झालेल्या कोळीवाड्यांमध्ये झोपू योजना राबवता येत नाही. स्थानिक रहिवाशांना स्वयंविकासासाठी जायचे आहे. त्यामुळे या भूखंडावर कोणत्याही झोपू योजनेला मंजुरी देऊ नये, असे साटम यांनी पत्रात म्हटले आहे.

Story img Loader