मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य महिलांविषयीही माझ्या मनात कायम आदराचीच भावना आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सुळे यांच्याबाबत बोलताना वापरलेल्या भाषेवरून टीका होऊ लागताच पाटील यांचा सूर नरमला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावर महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त करताना ‘सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा,’ असे वक्तव्य पाटील यांनी बुधवारी केले होते. त्यावर बरीच टीकाटिप्पणीही झाली़  सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकार तिहेरी चाचणी पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू करीत नाही, याबाबत संताप व्यक्त करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ग्रामीण पद्धतीने बोललो, असे पाटील म्हणाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमापोटी मी सात्विक संताप व्यक्त केला, त्यामुळे समाजाला आनंदच वाटला. यामध्ये सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही. कोणीही पराचा कावळा करू नये, असे पाटील यांनी नमूद केले. आरक्षण देता येत नसल्यास महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरी जावे, असे पाटील म्हणाले.