बॉलीवूडचा दबंग खान सलमान याने शनिवारी रात्री याकूब मेमनच्या समर्थनार्थ ट्विट केले आणि एकच खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या या ट्विटमुळे साता-यात शिवसैनिकांनी विरोध व्यक्त करत सलमानच्या पोस्टर्सला काळं फासल आहे. तसेच, बजरंगी भाईजानचा शो बंद पाडला. त्याच्या या ट्विटवरून विविध स्तरातून आलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-
सलमान खानच्या ट्विटला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्याकडे दुर्लक्ष करावे. याकूब मेनन संदर्भात सलमान खानचे ट्विट अर्थहीन व हास्यास्पदच – सलीम खान
याकूब मेमनला आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे त्यामुळेच या निकालावर जर सलमान खानने मतप्रदर्शन केलं असेल तो न्यायालयाचा अवमान ठरतो. सलमानचे खूप फोलोअर्स असून, तो एक चांगला अभिनेता आहे. त्याने वेळेत आपले ट्विट हटवावे नाहीतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.- विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम
कोणही उठेल आणि ट्विट करत बसेल म्हणून न्यायालयाने आपला निर्णय बदलावा का? त्यामुळे ट्विटवर प्रतिक्रिया देणा-यांकडे दुर्लक्ष करा – उद्धव ठाकरे</p>
जर सलमानने असं म्हटले असेल तर तुम्ही त्याच्या भावनांना समजून घ्या – शत्रुघ्न सिन्हा
सलमान खानने त्याचे वैयक्तिक मत मांडले, मृत्यूदंडाचे प्रकरण अत्यंत नाजूक असते – माजिद मेनन