महापालिके ची सुधारित नियमावली जारी
मुंबई : गणेशोत्सवात करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्र आणि टाळेबंद इमारतींमधील गणेश विसर्जनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाजवळच, तर प्रतिबंधित क्षेत्र व टाळेबंद इमारतींमधील घरगुती गणपतींचे घरीच विसर्जन करावे लागेल.
सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनासाठी १०, तर घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी पाच व्यक्तींनाच परवानगी आहे. आता प्रतिबंधित क्षेत्र आणि टाळेबंद इमारतींसाठी नियम तयार करण्यात आले आहेत. एकापेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर परिसर प्रतिबंधित करण्यात येतो. तसेच रुग्ण सापडलेल्या इमारतीचा काही भाग वा संपूर्णत: इमारत टाळेबंद करण्यात येते. सध्या मुंबईत ६२२ प्रतिबंधित क्षेत्रे असून तेथील घरांची संख्या नऊ लाख ६५ हजार ७९३, तर लोकसंख्या ४१ लाख ६ हजार ३२८ इतकी आहे. ५९६० टाळेबंद इमारती असून निर्बंध घातलेल्या या इमारतींमध्ये २ लाख ५८ हजार ३५२ घरे असून तेथील लोकसंख्या ९ लाख २ हजार २७० इतकी आहे. मात्र ठरावीक दिवसांमध्ये करोनाचा नवा एकही रुग्ण आढळून न आल्यास प्रतिबंधित क्षेत्र वा टाळेबंदीतून अनुक्रमे संबंधित ठिकाण किंवा इमारतीवरील निर्बंध उठवले जातील.
गणेशोत्सव काळापर्यंत यापैकी काही ठिकाणे वा इमारती निर्बंधमुक्त होतील. मात्र नवे रुग्ण सापडल्यानंतर काही ठिकाणे वा इमारतींवर निर्बंध येतील. ही बाब लक्षात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र आणि टाळेबंद इमारतींमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार प्रतिबंधित ठिकाणे वा टाळेबंद इमारतींमधील गणपती विसर्जनासाठी भाविकांना अन्य परिसरात जाता येणार नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडळाजवळच मोठी लोखंडी टाकी आणि पाण्याची व्यवस्था करून गणेश विसर्जन करावे लागेल, तर प्रतिबंधित ठिकाण व टाळेबंद इमारतीतील घरगुती गणपतींचे घरीच विसर्जन करावे लागणार आहे. शक्य झाल्यास माघी गणेशोत्सवात अथवा पुढील भाद्रपद महिन्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असेही आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. विसर्जनाच्या निमित्ताने करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेने ही काळजी घेतली आहे.
नियमावली
* गणपतीचे दर्शन ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट, फेसबुक, समाजमाध्यमांवर घडवावे. प्रसाद वाटणे, फुले, हार अर्पण करू नये.
* मंडपाचे आकारमान कमी ठेवावे.मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे.
* मुखपट्टय़ांचा वापर व सामाजिक अंतरासंबंधीच्या नियमांचे पालन.
* मंडपालगत फुले, हार, प्रसादाची दुकाने लावू नयेत.
* आरतीसाठी मंडपात दहा अन्य वेळी पाच व्यक्तींनाच परवानगी.
* मंडप सजावट, रोषणाई, देखावे करू नयेत.
* आरोग्याभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करावे.
* गर्दी होईल अशा कार्यक्रमाचे आयोजन नसावे.
* व्यावसायिक जाहिराती नको.
* सार्वजनिक मूर्तीचे विसर्जन मंडपालगतच्या कृत्रिम तलावात.
* घरी शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे.
* नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जनासाठी जाणे टाळावे.
* चाळीतील घरगुती गणेशमूर्ती एकत्रितरीत्या नेण्यास मनाई.
* विसर्जनस्थळी केली जाणारी आरती घरीच करावी.
* विसर्जनाला मुखपट्टी आणि स्वसंरक्षणाची साधने वापरावीत.
* लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाऊ नये.
* उत्सवप्रसंगी करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास संबंधितांविरुद्ध साथरोग कायद्यानुसार कारवाई.