मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक समुद्रकिनारी, प्रेक्षणीय स्थळी भेटी देतात. त्यामुळे नियमित प्रवाशांसह सुट्टीनिमित्त घराबाहेर पडलेल्यांची संख्या अधिक असते. मध्य रेल्वेवरील प्रमुख रेल्वे स्थानकांत गर्दीचा भार वाढतो. वर्षाच्या अखेरीस होणारी प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी महाराष्ट्रातील १३ आणि कर्नाटकातील एका रेल्वे स्थानकात फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. २ जानेवारीपासून पुन्हा फलाट तिकीट विक्री सुरू होईल, असे मध्य रेल्वेने सांगितले.

मुंबईसह राज्यातील विविध पर्यटनस्थळी वर्षअखेरच्या कालावधीत पर्यटकांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. बहुसंख्य प्रवासी प्रवास करताना रेल्वेसेवाचा वापर केला जातोय. गर्दीचा लोंढा वाढून प्रवाशांची धक्काबुक्की होऊन, त्याचे स्वरूप चेंगराचेंगरीसारखे होऊ शकते. अशा घटना टाळण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त केला आहे. यासह रेल्वे स्थानकात येणारी अतिरिक्त गर्दी रोखण्यासाठी, प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध आणले आहेत.

Metro Line 8 to Link Mumbai and Navi Mumbai Airports
मुंबई विमानतळ ते थेट नवी मुंबई विमानतळ…कशी असेल मेट्रो – ८? खासगी- सार्वजनिक उभारणीचे कोणते फायदे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
tapti ganga Express train loksatta
ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन राजस्थानच्या दोन प्रवाशांवर हल्ला, नंदुरबार स्थानकातील घटना
gahunje stadium ind vs eng t 20 match
Ind vs Eng : कोल्डप्लेसाठी स्वतंत्र ट्रेन, पण पुणेकरांना साधी बसही मिळेना; भारत वि. इंग्लंड सामन्यासाठी पोहोचण्याचा मनस्ताप अटळ!
Finance Minister approves purchase of 25000 privately owned st buses in five years
गाव तेथे नवी एसटी धावणार; पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या ‘लाल परी’ बस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
grihitha vichare kedarkantha loksatta news
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने १० वर्षाच्या ग्रिहीथाने उत्तराखंडाच्या केदारकंठावर फडकविला प्रतिकात्मक राष्ट्रध्वज
paragliding in goa
Paragliding in Goa : गोव्यातील पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने ‘या’ उपक्रमावर आणली स्थगिती!

हेही वाचा – प्रवाशांची आर्थिक कोंडी, खासगी वाहतूकदारांकडून बसभाड्यात वाढ

वृद्ध, रुग्ण, महिलांना सूट

वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशा प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होण्यासाठी त्यांना फलाट विक्री निर्बंधांमधून सूट दिली आहे. त्यामुळे त्यांना फलाट तिकीट विकत घेता येणे शक्य होणार आहे. वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे. नियमांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे केले आहे.

हेही वाचा – मुंबई : मालाड येथे १० वर्षांच्या मुलाची आत्महत्या

कोणत्या स्थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद

● मध्य रेल्वेने राज्यातील १३ आणि कर्नाटकातील एका स्थानकावर फलाट तिकीट विक्री बंद करण्याचे जाहीर केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, लातूर आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथे फलाट तिकीट मिळणार नाही.

Story img Loader