जपानी कंपनीची जाहीर नोटीस; खाद्यपदार्थातून बाद नसले तरी उच्चारातून बंद होणार
चायनीज पदार्थाना चव आणणारा अविभाज्य घटक अजिनोमोटो त्याच्या घातकतेवर कितीही चर्चा झाली तरी ‘अन्ना’मधून आजतागायत सारला गेला नाही. मात्र त्याचा उच्चार लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ‘मोनोसोडिअम ग्लुटामेट’च्या (एमएसजी) संदर्भात आपण ‘अजिनोमोटो’ या शब्दाचा सर्रास वापर करीत असलो, तरी खरेतर ‘अजि-नो-मोटो’ या नावाने एका जपानी कंपनीचा ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) आहे. या कंपनीचे नावच मुळी ‘अजिनोमोटो कंपनी’ असे असून यापुढे या शब्दाचा सरसकट वापर करण्यात येऊ नये, असे कंपनीने जाहीर नोटिशीद्वारे बजावले आहे.
आपली कंपनी खाद्यपदार्थात अधिकची चव आणण्याकरिता वापरले जाणारे ‘मोनोसोडिअम ग्लुटामेट’ (एमएसजी- एक प्रकारचे अमिनो अॅसिड) तयार करते. आणि हे एमएसजी ‘अजि-नो-मोटो’ या ब्रँडखाली गेली कित्येक वर्षे विकले जात आहे, असे या कंपनीचे म्हणणे आहे. ‘याचाच अर्थ एखाद्या पदार्थात एमएसजी आहे, याचा अर्थ ते ‘अजि-नो-मोटो’ असेलच असे नाही. म्हणून आमच्या ‘अजि-नो-मोटो’ या उत्पादनाचा ‘एमएसजी’चा संदर्भ देताना किंवा त्याचे वर्णन करताना जो ‘सामान्यनाम’ (जेनेरिक नेम) म्हणून वापर केला जातो तो थांबविण्यात यावा,’ असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच, या पुढे ‘अजिनोमोटो’ या शब्दाचा विपर्यास करणारा वापर केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर दिवाणी दावा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे.
‘अजिनोमोटो’ शब्दाच्या सरसकट वापरावर र्निबध
एमएसजी ‘अजि-नो-मोटो’ या ब्रँडखाली गेली कित्येक वर्षे विकले जात आहे, असे या कंपनीचे म्हणणे आहे.
Written by रेश्मा शिवडेकर
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-01-2016 at 01:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions on use of the ajinomoto word due to trade mark of japan company