मुंबई : दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. तेथील विजयी उमेदवार हा अपक्ष आहे, पण ‘‘शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय आहे’’, अशी टीका त्यांनी केली.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना दिसत आहेत. त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांचा अग्रलेख मी वाचला.  शिवसेनेने डंका सुरू केला की, राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती निशाणी फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच.

Story img Loader