स्थानिक स्वराज्य कर (एलबीटी) विरोधात पुण्यानंतर आता मुंबई-ठाणे-नवी मुंबईतील किरकोळ किराणा माल दुकानदारांच्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेतर्फे सोमवारी आंदोलन छेडण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील किराणा मलाची किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आझाद मैदानात सोमवारी होणाऱ्या आंदोलनात सुमारे २० हजार किराणा माल दुकानदार सहभागी होणार असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. एलबीटीचा निषेध करून याविरुद्ध बेमुदत बंद पुकारायचा किंवा नाही याबाबत विचार केला जाणार आहे. बेमुदत संपाचा निर्णय झाला तर त्यात मुंबई-ठाणे-नवी मुंबई परिसरातील जवळपास २ लाख व्यापारी सहभागी होतील.
मुंबई-ठाणे-नवी मुंबईत एलबीटीविरोधात उद्या किराणा दुकाने बंद
स्थानिक स्वराज्य कर (एलबीटी) विरोधात पुण्यानंतर आता मुंबई-ठाणे-नवी मुंबईतील किरकोळ किराणा माल दुकानदारांच्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेतर्फे सोमवारी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
First published on: 07-04-2013 at 01:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retail shop of mumbai thane navi mumbai remain close over local body tax