स्थानिक स्वराज्य कर (एलबीटी) विरोधात पुण्यानंतर आता मुंबई-ठाणे-नवी मुंबईतील किरकोळ किराणा माल दुकानदारांच्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेतर्फे सोमवारी आंदोलन छेडण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील किराणा मलाची किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आझाद मैदानात सोमवारी होणाऱ्या आंदोलनात सुमारे २० हजार किराणा माल दुकानदार सहभागी होणार असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. एलबीटीचा निषेध करून याविरुद्ध बेमुदत बंद पुकारायचा किंवा नाही याबाबत विचार केला जाणार आहे. बेमुदत संपाचा निर्णय झाला तर  त्यात मुंबई-ठाणे-नवी मुंबई परिसरातील जवळपास २ लाख व्यापारी सहभागी होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा