’ ई-कॉमर्स संकेतस्थळांना टक्कर देणार ; ’ ग्राहकांच्या वेळेची बचत
ऑनलाइन सेलच्या धमाक्यात हरवत असलेल्या किरकोळ विक्रेत्यांना बाजारात टिकून राहणे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या ई-उद्योगाला टक्कर देण्यासाठी किरकोळ विक्रेतेही आता या ऑनलाइनच्या बाजारात उतरण्याच्या तयारीत असून त्यांच्यासाठी एक अनोखे ‘अॅप’ बाजारात आले आहे.
आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातो त्यावेळेस दोन ते तीन दुकानांमध्ये त्याची किंमत काढतो. मग त्यातून जेथे ती वस्तू स्वस्त आहे अशा दुकानातून आपण ती खरेदी करतो. अनेकदा तर आपण खरेदी केल्यावर दुसऱ्या एका दुकानात तीच वस्तू आणखी स्वस्तात उपलब्ध असल्याचे समजते. मग आपण हळहळतो. वस्तूच्या किमती काढत या दुकानातून त्या दुकानात करावयाच्या या पद्धतीच्या खरेदीत आपला बराचसा वेळही जातो. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला ‘अॅपी-फॉर रिटेलर्स’ हे अॅप मदत करू शकणार आहे.
हे अॅप ‘अॅपी मोबिइक्विटी’ या कंपनीने विकसित केले आहे. यात मुंबईसह देशातील सात प्रमुख शहरांतील शेकाडो किरकोळ व्यापाऱ्यांच्या नोंदी व त्यांची ४५ लाखांहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणापासून जवळ असलेल्या कोणत्या दुकानात आपल्याला पाहिजे ती गोष्ट उपलब्ध आहे, तसेच ती किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे, याचा तपशील मिळणार आहे. हा तपशील मिळाल्यावर आपल्याला पाहिजे त्या दुकानातून आपण ती वस्तू विकत घेऊ शकणार आहोत. यासाठी आपण या अॅपच्या माध्यमातूनच संबंधित दुकानदाराला संदेश पाठवून उत्पादनाची माहिती मिळवू शकतो. ही माहिती तुम्हाला अध्र्या तासाच्या आत दुकानदारांकडून उपलब्ध होणार आहे. ती मिळाल्यावर तुम्ही थेट त्या दुकानात जाऊन ती वस्तू खरेदी करू शकता. यामुळे तुमचा बराचसा वेळ वाचेल तसेच तुम्हाला पाहिजे ती वस्तू पाहिजे त्या वेळात उपलब्ध होईल, असा अॅप कंपनीचा दावा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा