‘बेस्ट’मधून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ९०० रुपयांमध्ये वर्षभराचा बसपास देण्याची घोषणा महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी गुरुवारी केली. बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळीची भेट ठरली आहे. मात्र सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करून बसपास आणखी स्वस्तात देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे बेस्टसाठी खर्च करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना मोफत बसपास द्यावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र बेस्ट प्रशासनाने निवृत्त कर्मचाऱ्यांना १५०० रुपयांमध्ये वर्षभराचा बसपास देण्याचा प्रस्ताव गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सादर केला होता. मोफत बसपास देण्याची मागणी केलेली असतानाही निवृत्त कर्मचाऱ्यांना तो १५०० रुपयांमध्ये देण्यात येत असल्याबद्दल शिवसेना नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती.
निवृत्त कर्मचाऱ्यांना ९०० रुपयांमध्ये वर्षभराचा बसपास देण्याबाबत मांडलेली उपसूचना प्रशासनाने मान्य केली. त्यामुळे आता निवृत्तांना ९०० रुपयांमध्ये बसपास मिळणार आहे.
निवृत्त ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना ९०० रुपयांमध्ये वार्षिक पास
‘बेस्ट’मधून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ९०० रुपयांमध्ये वर्षभराचा बसपास देण्याची घोषणा महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी गुरुवारी केली.
आणखी वाचा
First published on: 01-11-2013 at 03:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired best employee to get yearly bus pass within 900 rupees