लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) दिलेल्या घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईच्या आदेशाची वसुली करण्यासाठी आतापर्यंत निवृत्त महसूल अधिकाऱ्याची मदत घेतली जात होती. आता ४०० कोटींची थकबाकी असलेल्या मुंबई उपनगर व पुण्यात महारेराकडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात निवृत्त तहसीलदाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे वसुली आदेशांची अंमलबजावणी वेगाने होईल, असा विश्वास प्राधिकरणाला वाटत आहे.

Mumbai , constructions, MHADA , projects, Notices ,
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Chandrapur marathi news
चंद्रपूर : सफाई कामगार, शिल्पनिदेशक पदांसाठी ३५ हजारांची लाच, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या…
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक

वसुली आदेशांची थकबाकी वाढत असल्याने महारेराने निवृत्त महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करून गेल्या काही महिन्यात मोठी वसुली करण्यात आली. परंतु मुंबई उपनगर आणि पुणे या दोन जिल्ह्यात अद्याप ४०० कोटींच्या घरात थकबाकी आहे. त्यामुळे या वसुलीवर महारेराने लक्ष केंद्रित केले आहे. महारेराचे माजी अध्यक्ष अजोय मेहता यांनी अशा प्रकारच्या वसुलीसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच निवृत्त तहसीलदार नियुक्त करण्याबाबत निर्णय घेतला. आता विद्यमान अध्यक्ष मनोज सौनिक यांनी मुंबई उपनगर आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून निवृत्त तहसीलदारांच्या नियुक्तीचा आग्रह धरला आहे.

आणखी वाचा-१३७ कोटींच्या फसवणूकप्रकरणी ‘ईडी’ची देशभरात कारवाई

महारेराच्या प्रस्तावानुसार, या निवृत्त तहसीलदारांचे वेतन व इतर सुविधांचा खर्च महारेरा उचलणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित निवृत्त तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयात जागा उपलब्ध करून द्यायची आहे. या निवृत्त तहसीलदारांनी महारेराच्या प्रत्येक आदेशानुसार वसुली होईल, याबाबत पाठपुरावा करून कार्यवाही करायची आहे. निवृत्त तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करतील. मात्र महारेरा वसुली आदेशाचे प्रमुख काम त्यांच्याकडे असेल, असे महारेरातील सूत्रांनी सांगितले.

महारेराने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ते सातत्याने सर्व संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्कात राहून पाठपुरावा करीत असतात. आता जिल्हाधिकारी कार्यालयात निवृत्त तहसीलदार नेमल्यामुळे वसुली अधिक वेगाने होईल. असा विश्वास महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-गृह फसणुकीप्रकरणी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा

महारेराने आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे २०० कोटी रुपये वसूल करण्यात यश मिळविले आहे. मुंबई उपनगरात ७३ प्रकल्पांतील ३५५ तक्रारींपोटी सुमारे २२८ कोटी तर पुणे जिल्ह्यात ८९ प्रकल्पांतील २०१ तक्रारींपोटी १५० कोटी थकबाकी आहे. महारेराने नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत ४४२ प्रकल्पांतील ७०५ कोटींच्या वसुलीसाठी ११६३ वसुली आदेश जारी केले आहेत. यापैकी १३९ प्रकल्पांतील २८३ वसुली आदेशापोटी २०० कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत.

Story img Loader