राजकारणातून निवृत्ती याचा अर्थ समाजकारणातूनही निवृत्ती असा होत नाही. मी लोकांच्या कामासाठी कायम उपलब्ध असेन, असे काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे सोमवारी जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर गुरुदास कामत यांनी मंगळवारी आपण समाजकारणातून निवृत्ती घेतली नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. मी केवळ वैयक्तिक कारणांमुळे राजकारणातून निवृत्ती घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कामत काँग्रेसबाहेर
कामत यांनी सोमवारी पक्षाचे नेते आणि समर्थकांना पाठविलेल्या संदेशात राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. दहा दिवसांपूर्वी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राजीनाम्याचा मनोदय व्यक्त केला होता. तसेच सोनिया आणि राहुल गांधी यांना या संदर्भात पत्रही लिहिले होते. उभयतांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने राजकारणातून निवृत्त पत्करत असल्याचे कामत यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा