लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : पाच तरूणींचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली २५ वर्षीय रिक्षा चालकाला शनिवारी पोलिसांनी अटक केली. पीडितांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. १५ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर चार पीडितांचाही आरोपीने विनयभंग केल्याचा आरोप आहे.

mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा
amravati case has been registered against prankster youth
मॉलमध्‍ये प्रँक करणे पडले महागात; स्‍वच्‍छतागृहात सोडले रॉकेट, गुन्‍हा दाखल
14 year old girl living in slum raped by retired police sub inspector from Nagpur city police Force
निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

रोहित भोसले (२५) असे अटक आरोपीचे नाव आसून तो कांदिवली पूर्व येथील रहिवासी आहे. पीडित तरूणी शिकवणीवरून शुक्रवारी घरी जात होती. त्यावेळी कांदिवली पूर्वी येथील एव्हरशाईन क्राऊन इमारतीसमोर एक रिक्षाचालक वेडीवाकडी वळणे घेत रिक्षा चालवत होता. त्याने अचानक पीडित मुलीच्या शेजारी रिक्षा थांबवली आणि तिचा विनयभंग केला. दुपारी २ ते ७ यादरम्यान आरोपीने रिक्षातून जाताना आणखी चार तरूणींबरोबर गैरप्रकार केले. त्यात १७, २७, २६ व १९ वर्षांच्या तरूणींचा समावेश आहे.

आणखी वाचा-मुंबई : विमानात बॉम्बच्या धमकीची चिठ्ठी, सहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी १५ वर्षीय पीडित मुलीने समता नगर पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन रात्री उशीरा भोसलेला अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगितले. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader