मुंबई : २० वर्षीय महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आरे पोलिसांनी २४ वर्षीय रिक्षाचालकाला रविवारी अटक केली. हा प्रकार मे महिन्यात घडला होता, परंतु महिलेने नुकतीच तक्रार दाखल करताच पोलिसांनी रिक्षाचालकाला रविवारी उत्तर प्रदेशामधून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गोरेगाव येथे राहते. सीबीडी – बेलापूर येथून १७ मे रोजी ती रिक्षाने गोरेगाव येथे येत होती. रिक्षा आरे जंगलाजवळ आल्यावर चालकाने लघुशंकेचे निमित्त करून रिक्षा थांबवली. कोणीही नसल्याचे पाहून आरोपीने तरुणीला धाक दाखवून निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली आणि या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Woman Raped By Mantrik in Mumbai
Mumbai Crime : महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार
cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
Ulhasnagar Bangladesh loksatta news
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Asaram Bapu
Asaram Bapu : आसाराम बापूला २०१३च्या बलात्कार प्रकरणात दिलासा! राजस्थान उच्च न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा

हेही वाचा – चिंबई, वारींगपाडा समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमणार, मुंबई महानगरपालिका ९४ लाख रुपये खर्च करणार

घाबरलेल्या महिलेने याबाबत कोणाकडेही वाच्चता केली नाही. मात्र या घटनेनंतर तिची प्रकृती बिघडली. या घटनेनंतर पीडित महिला मानसिक तणावाखाली होती. तिच्या कुटुंबीयांनी विचारणा केली असता एका रिक्षाचालकाने विनयभंग केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तिच्यावर झालेल्या बलात्काराबाबतची माहिती तिने दिली. याप्रकरणी ६ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी रविवारी आरोपीला अटक केली.

Story img Loader