मुंबई: गांजाची तस्करी करणाऱ्या रिक्षा चालकाला पार्कसाईट पोलिसांनी घाटकोपर परिसरातून अटक केली. सदर रिक्षाचालकाच्या ताब्यातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी शहरात अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घाटकोपरमधील अमृतनगर परिसरात एक रिक्षाचालक गांजाची विक्री करत असल्याची माहिती पार्कसाईट पोलिसांना मिळाली. त्यानुसार पार्कसाईट पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पाहणी करीत असताना पोलिसांना रिक्षाचालक जाफर अन्सारी (४४) संशयास्पदरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे दीडशे ग्राम गांजा सापडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

drunken driver lost control of auto rickshaw running on opposite direction overturned passenger killed
मद्यपी रिक्षाचालकाचा बेदरकारपणा प्रवाशाच्या जीवावर; रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Illegal gutkha worth Rs 21 lakh seized in Ghatkopar Mumbai news
घाटकोपरमध्ये २१ लाख रुपयांचा अनधिकृत गुटखा जप्त, दोघांना अटक
Cheating on petrol pumps bike are filled with water in mumbai kurla petrol pump video
VIDEO: धक्कादायक! मुंबईतील ‘या’ पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या नावाखाली चक्क पाणी भरत होते; बाईक चालकानं कसं शोधून काढलं पाहा
One mistake and the game is over Young man's unnecessary stunt in the swimming pool viral video will make you shiver
“एक चूक अन् खेळ खल्लास!” स्विमिंग पुलमध्ये तरुणाची नको ती स्टंटबाजी, Viral Video पाहून अंगावर येईल काटा
old cople Video goes viral
“तूपात तूप गायीचे….”, आजोबांनी आजींसाठी घेतला भन्नाट उखाणा, सुंदर नात्याचा Viral Video एकदा बघाच
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”
passenger was robbed by thieves on the skywalk of Kalyan railway station
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर प्रवाशाला चोरट्यांनी लुटले
Story img Loader