मुंबई: गांजाची तस्करी करणाऱ्या रिक्षा चालकाला पार्कसाईट पोलिसांनी घाटकोपर परिसरातून अटक केली. सदर रिक्षाचालकाच्या ताब्यातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी शहरात अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घाटकोपरमधील अमृतनगर परिसरात एक रिक्षाचालक गांजाची विक्री करत असल्याची माहिती पार्कसाईट पोलिसांना मिळाली. त्यानुसार पार्कसाईट पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पाहणी करीत असताना पोलिसांना रिक्षाचालक जाफर अन्सारी (४४) संशयास्पदरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे दीडशे ग्राम गांजा सापडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.