भांडुप येथे रस्त्यावरुन चालणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. राम हिरानंदानी (८२) असे त्यांचे नाव आहे. हिरानंदानी हे लाल बहादूर शास्त्री रोडवरील बॅंक ऑफ इंडिया समोरून जात असताना समोरुन येणाऱ्या एका रिक्षाचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. हिरानंदानी रस्त्यावर कोसळले.मात्र रिक्षाचालक त्यांना मदत करण्याऐवजी तेथून फरार झाला. त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या काही महाविद्यालयीन तरुणांना हिरानंदानी जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी ताबडतोब त्यांना न्यू लाईफ रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून फरारी रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.    

Story img Loader