डोंबिवली पश्चिमेच्या घनश्याम गुप्ते रस्त्यावरील इंदिरानगर भागात रिक्षाचालकाने एका सात वर्षांच्या मुलीला अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईच्या जागरूकतेमुळे मुलीची तात्काळ सुटका झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
निवृत्ती बनसोडे (३८)असे या रिक्षाचालकाचे नाव असून त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले, असे पोलीस उपनिरीक्षक भास्कर रेणुके यांनी सांगितले. इंदिरानगर भागात राहणारी एक सात वर्षांची मुलगी मंगळवारी संध्याकाळी अचानक बेपत्ता झाली. निवृत्ती बनसोडेने या मुलीला आपल्या घरात अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने नेऊन तिला मारहाण करून, धमकावून तिचे तोंड बांधून ठेवले.
मुलगी दिसत नसल्यामुळे तिच्या आईने आरडाओरडा केला. त्या वेळी घाबरलेल्या निवृत्तीने मुलीला दम देऊन घराबाहेर गुपचूप सोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एका मुलीनेच पाहिला. ताबडतोब मुलीच्या आईने विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन निवृत्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा