मालवणीत एका रिक्षाचालकाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आली. अद्रार अन्सारी (२९) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. मालवणी पोलीस ठाण्याच्या मार्वे पोलीस चौकीजवळच शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
हल्ला झाल्यानंतर अन्सारी स्वत: पोलीस चौकीत हजर झाला. त्याला भगवती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झाल्याने तो आरोपींची नावे आणि नेमकी माहिती सांगू शकला नाही. मालवणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही त्याच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवून त्याचे कुणाचे वैमनस्य होते का त्याचा तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ यांनी सांगितले.

Story img Loader